दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे माधव कामत, अशोक भोईटे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:05+5:302021-02-26T04:34:05+5:30

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने सन २०१९ मधील ग्रंथ पुरस्कार वितरण, विशेष कृतज्ञता सन्मान तसेच ...

Dakshin Maharashtra Sahitya Sabha honors Madhav Kamat, Ashok Bhoite | दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे माधव कामत, अशोक भोईटे यांचा सन्मान

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे माधव कामत, अशोक भोईटे यांचा सन्मान

Next

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने सन २०१९ मधील ग्रंथ पुरस्कार वितरण, विशेष कृतज्ञता सन्मान तसेच राज्य वाङ्मय पुरस्कारप्राप्त लेखकांचा सन्मान समारंभ शनिवारी (दि.२७) रोजी सकाळी १०.३० वा. शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक माधव मुकुंद कामत आणि ज्येष्ठ कवी अशोक भोईटे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

माधव कामत आणि अशोक भोईटे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार होणार आहे. राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. व्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांचाही यावेळी सत्कार होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख पाहुणे असून, दमसाचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांची उपस्थिती राहणार आहे.

देवदत्त पाटील पुरस्कार : मृत्यूस्पर्श (कादंबरी)- डॉ. सतीश कुमार पाटील, शंकर खंडू पाटील पुरस्कार : सत्यवादी (कथासंग्रह) - बजरंग दत्तू , अण्णाभाऊ साठे पुरस्कार : उद्ध्वस्त मनाचा गाभारा (सामाजिक) - वासंती मेरू, कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार : सत्यशोधकीय नियतकालिके (संकीर्ण) -डॉ.अरुण शिंदे, चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) : न बांधल्या जाणाऱ्या घरात (कवितासंग्रह)-डॉ. सुप्रिया आवारे , शैला सायनाकर पुरस्कार : शेणाला गेलेल्या पोरी (कवितासंग्रह) - चंद्रशेखर कांबळे आणि बालवाङ्मय पुरस्कार : बार्बी डॉल - वर्षा चौगुले. तसेच सखा कलाल पुरस्कार : फास - बाळासाहेब पाटील, अनुराधा गुरव पुरस्कार : अरुणोदय-स्वाती शिंदे पवार, सूर्य गोंदला भाळी-जगजित महावंश, जिणं त्यांचं -मंगेश मंत्री, कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे-लवकुमार मुळे, वारणेची लेकरं-विठ्ठल सदामते, सावज-सुनील देसाई, गंध सोनचाफी-गौतम कांबळे, निर्भय-उमेश सूर्यवंशी, भारतीय संविधान आणि लोक - विश्वास सुतार यांना कुलगुरूंच्या हस्ते या कार्यक्रमात सन २०१९ मधील ग्रंथ पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि कार्यवाह गोविंद पाटील यांनी दिली आहे.

(संदीप आडनाईक)

दोघांचे फोटो आहेत :

२५०२२०२१-कोल-माधव कामत

२५०२२०२१-कोल-अशोक भोईटे

===Photopath===

250221\25kol_1_25022021_5.jpg~250221\25kol_2_25022021_5.jpg

===Caption===

25022021-Kol-Madhav Kamat ~25022021-Kol-Ashok Bhoite

Web Title: Dakshin Maharashtra Sahitya Sabha honors Madhav Kamat, Ashok Bhoite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.