श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहाटे दक्षिणद्वार सोहळा संपन्न; भाविकांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:45 AM2024-07-16T09:45:32+5:302024-07-16T09:46:20+5:30
कृष्णा नदीचे ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा झपाट्याने वाढ झाली आणि आज पहाटे ४ वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
प्रशांत कोडणीकर
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा पहाटे ४ वाजता संपन्न झाला कर्क संक्रमणाच्या योगावर भाविकांनी स्नानासाठी पहाटेही गर्दी केली. उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने मंदिरात आलेले कृष्णा नदीचे ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा झपाट्याने वाढ झाली आणि आज पहाटे ४ वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गुजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला काल पासून नदीच्या पाणी पात्रात वाढ होत असल्याने दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने सांगली कोल्हापूर इचलकरंजी, मिरज व कोकण आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प प श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूलावर पाणी आले आहे.
दक्षिणदवार सोहळा या योगायोगच
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणदवार सोहळा म्हणतात . श्री चरणावरून येण्याऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केलेने पापांचा ह्रास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असलेने भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात मात्र नदीची पाणी पातळी वाढणे, कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असलेने व मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट एक फूट उंचीची असलेने हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही यात स्नान करायला मिळणे हा योगायोगच असतो.हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असा दोन वेळा होतो.