दालमियाने नोकरीत भूमिपूत्रांना संधी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:47+5:302021-07-10T04:17:47+5:30
निवेदनात म्हटले आहे, कारखाना उभारणीसाठी पोर्ले तर्फ ठाणे आणि आसुर्ले गावातील शेतकऱ्यांनी अल्पदरात देऊन त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. ...
निवेदनात म्हटले आहे, कारखाना उभारणीसाठी पोर्ले तर्फ ठाणे आणि आसुर्ले गावातील शेतकऱ्यांनी अल्पदरात देऊन त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यामुळे कारखाना उभारणीत येथील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे.कंपनीने साखर कारखाना, डिस्टलरी आणि सहवीज प्रकल्पात नोकरीसाठी परप्रांतीय आणि परजिल्ह्यातल्यांना संधी देऊन भूमिपूत्रांवर अन्याय केला आहे.स्थानिकांना नोकरीबाबत तांत्रिक कारण सांगून डावलेले असल्याचे अनेक अनुभव आहे. कारखान्यातून निर्मित होणारे प्रदूषणाचा त्रास दोन्ही गावांनी का सोसायचा? असा सवाल निवेदनातून कंपनीला केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाला वाहतूक खर्च कमी असून परिसरातील शेतकऱ्यांना जादा दर देणे गरजेचे आहे. या मागण्याची कंपनीकडून पुर्तता झाली नाही तर दोन्ही गावातून सामुदायिक उठाव करून आंदोलन छेडले जाईल.