जयसिंगपूर येथे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:26+5:302021-05-29T04:19:26+5:30
जयसिंगपूर : मागासवर्गीय पदोन्नती रद्द आदेश मागे घ्यावा व मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जयसिंगपूर येथील क्रांती चौकात ...
जयसिंगपूर : मागासवर्गीय पदोन्नती रद्द आदेश मागे घ्यावा व मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जयसिंगपूर येथील क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आदम मुजावर, कैलास काळे, गजानन पवार यांनी केले. मुजावर म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी आरक्षण दिले होते. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांची पदोन्नती रद्द करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे. तो आदेश मागे घ्यावा व मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सरकारने अधिवेशन बोलवावे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.