माद्याळ येथे हत्तींकडून उसाचे १०० टनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:50+5:302020-12-12T04:40:50+5:30
हत्ती व गव्यांकडून पिकांचे नुकसान दैनंदिन सुरू आहे. देवर्डे येथील जंगलात हत्ती वास्तव्यास आहे. जंगलाशेजारी असलेल्या रांगी नावाच्या ...
हत्ती व गव्यांकडून पिकांचे नुकसान दैनंदिन सुरू आहे. देवर्डे येथील जंगलात हत्ती वास्तव्यास आहे. जंगलाशेजारी असलेल्या रांगी नावाच्या शेतात ऊस व भाताचे मोठे क्षेत्र आहे. रात्रभर शेतात येऊन धुमाकूळ घालत आहे. सकाळी कृष्णा शेळके यांच्या शेतातील विहिरीतील पाणी गढूळ करून पुन्हा जंगलात वास्तव्यास जात आहे.
सततच्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने हत्ती, गव्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
---------------------
* पीक कर्ज भरावे
दररोजच्या नुकसानीमूळे ऊस नाहीसा झाला आहे. चालूवर्षीचे पीक कर्ज भरणे मुश्किल झाल्याने शासनाने शेतकऱ्यांचे पीक कर्ज भरण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी शेळके यांनी केली आहे.
-
----------------------
फोटो ओळी : माद्याळ (ता. आजरा) येथे शिवाजी शेळके यांच्या शेतात हत्तीने धुमाकूळ घालून ऊस पिकाचे केलेले नुकसान.
क्रमांक : १११२२०२०-गड-०९