जिल्ह्यात १५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:48 AM2018-10-24T00:48:12+5:302018-10-24T00:48:16+5:30
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांचे जवळपास १५ ...
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांचे जवळपास १५ हजार हेक्टर ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग अशा पिकांचे नुकसान झाले. पंचनाम्यांतून हे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला.
यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलै-आॅगस्टदरम्यान तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग अशी उभी पिके पाण्यात राहून अक्षरश: कुजली. याबाबत विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आवाज उठवत तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते; परंतु ते काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. गतमहिन्यात जिल्हा दौºयावर आलेल्या विभागीय आयुक्तांनाही याबाबत विचारणा केल्यावर त्यांनीही कानावर हात ठेवत जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या मनात हे पंचनामे कधी पूर्ण होणार व त्याचा अहवाल शासनाकडे अहवाल शासनाकडे कधी जाणार? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
मात्र याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडून विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी पाठविला. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरमधील ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग अशा पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये सुमारे ५३ हजार शेतकºयांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होणार आहे.