शिरोली दुमाला येथे गोठ्याला आग लागून ५० हजार रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:15 AM2021-03-30T04:15:27+5:302021-03-30T04:15:27+5:30
सावरवाडी : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे होळी सणाच्या दिवशीच सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बाबूराव कुंडलिक ...
सावरवाडी : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे होळी सणाच्या दिवशीच सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बाबूराव कुंडलिक पाटील यांच्या घरावर वेल्डिंग काम चालू असताना अचानक वेल्डिंगची ठिणगी पडून जनावरांच्या गोठ्यास आग लागली. या आगीत सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.
घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्यात जनावरांना वाळकी वैरण लागते म्हणून माळ्यावर वैरण भरली होती. घरावर वेल्डिंगचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडून घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यातील वैरणीने पेट घेतला.
गोठ्यास आग लागताच गल्लीतील नागरिकांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी पाणी मारून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गोठ्यातील जनावरे तातडीने बाहेर काढण्यास ग्रामस्थांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
फोटो ओळ- शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे होळी सणाच्या दिवशी (रविवारी) घरावर वेल्डिंगचे काम करताना जनावरांच्या गोठ्यास आग लागली, यामध्ये पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.