पाटगाव परिसरातील बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:43+5:302021-07-23T04:15:43+5:30

वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शेतात घुसल्याने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच परिसरातील तांबाळे, दासेवाडी, ममदापूर, ...

Dams in Patgaon area under water | पाटगाव परिसरातील बंधारे पाण्याखाली

पाटगाव परिसरातील बंधारे पाण्याखाली

Next

वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शेतात घुसल्याने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच परिसरातील तांबाळे, दासेवाडी, ममदापूर, सुक्याच्या वाडी, करडवाडी, अनप, शेळोली हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद झालेली आहे, तर आजरा- नवले या मार्गावरील नवले येथील ओढ्याला पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कडगाव, पाटगाव रस्त्यावरील काळ्या ओढ्यानजीक साठलेल्या पाण्याचा निचरा होऊ न शकल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूचा काही भाग वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी ओढे, नाले दुथडी भरून वाहत असल्याने तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी व सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फोटो : ममदापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने आजरा मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली.

Web Title: Dams in Patgaon area under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.