‘दमसा’ने साहित्यिक लोकशाही निर्माण केली: तारा भवाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:44 AM2019-05-13T00:44:53+5:302019-05-13T00:45:00+5:30

कोल्हापूर : सर्व प्रकारचे लेखन करणाऱ्या लेखकांच्या साहित्यकृतींचा गौरव करून साहित्यिक लोकशाही निर्माण करण्याचे काम ‘दमसा’ने केले आहे, असे ...

'Damsa' created a literary democracy: Tara Bhawalkar | ‘दमसा’ने साहित्यिक लोकशाही निर्माण केली: तारा भवाळकर

‘दमसा’ने साहित्यिक लोकशाही निर्माण केली: तारा भवाळकर

googlenewsNext

कोल्हापूर : सर्व प्रकारचे लेखन करणाऱ्या लेखकांच्या साहित्यकृतींचा गौरव करून साहित्यिक लोकशाही निर्माण करण्याचे काम ‘दमसा’ने केले आहे, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी रविवारी केले.
शाहू स्मारक भवनात दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेतर्फे धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार व दक्षिण महाराष्टÑातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार प्रदान समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती ‘दमसा’चे अध्यक्ष विजय चोरमारे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, उपाध्यक्ष भीमराव धुळूबुळू, गौरी भोगले, कार्यवाह गोविंद पाटील, प्रा. एकनाथ पाटील, आदींची होती.
यावेळी डॉ. भवाळकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, दक्षिण महाराष्टÑ साहित्य पुरस्कार व विशेष पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. भवाळकर म्हणाल्या, अभिव्यक्तीला कोणताही साचा नसतो; त्यामुळे अनेकजण सूर, ताल, संगीत, दिग्दर्शन अशा माध्यमांतून व्यक्त होत असतात. पूर्वीच्या काळापासून महिला वर्तमानात जगत असून, त्या व्यक्तही झाल्या आहेत; त्यासाठी जात्यांवरील ओव्यांसारखी माध्यमे होती. ‘दमसा’ने लेखकांना एक चांगले व्यासपीठ दिले आहे.
विजय चोरमारे म्हणाले, ‘दमसा’तर्फे दिले जाणारे पुरस्कार हे योग्य निकषाद्वारे काळजीपूर्वक दिले जातात. हे पुरस्कार देताना दुर्लक्षित कवी, लेखकांना प्राधान्य दिले आहे.
लेखिका संजीवनी तडेगावकर, संपत देसाई, भास्कर जाधव, संग्राम गायकवाड, दत्ता घोलप यांचे भाषण झाले. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन, डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले. पाटलोबा पाटील, विलास माळी, आदी उपस्थित होते.

विशेष पुरस्कार
दिग्दर्शक भास्कर जाधव, लेखक वि. दा. वासमकर, संजय कांबळे, रवी राजमाने, जीवन साळोखे, श्रीधर कुदळे, दत्ता पाटील, उर्मिला आगरकर, दत्तात्रय मानुगडे, सोनाली नवांगुळ, रघुराज मेटकरी, सलीम मुल्ला, सुनील जवंजाळ, सुनील पाटील, धनाजी घोरपडे, महेशकुमार कोष्टी, सविता नाबर, अंजली देसाई, योजना मोहिते, प्रशांत नागावकर, कबीर वराळे, दिनेश वाघुंबरे, प्रमोद बाबर, किरण कुलकर्णी यांना विशेष पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यांना मिळाले पुरस्कार
धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार
सुचित खल्लाळ (प्रलयानंतरची तळटीप)
संजीवनी तडेगावकर (संदर्भासहित)

दक्षिण महाराष्टÑ साहित्य पुरस्कार
देवदास पाटील पुरस्कार : लेखक संग्राम गायकवाड शंकर खंडू पाटील पुरस्कार : लेखक दिनकर कुटे अण्णा भाऊ साठे पुरस्कार : लेखक संपत देसाई कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार : लेखक दत्ता घोलप चैतन्य माने पुरस्कार : लेखक अलोक जत्राटकर शैला सायनाकर पुरस्कार : लेखक महादेव कांबळे बालसाहित्य पुरस्कार : लेखिका गायत्री शिंदे

Web Title: 'Damsa' created a literary democracy: Tara Bhawalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.