ट्रॅक्टर चालकांनी नाचवल्या नृत्यांगना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:59+5:302021-03-13T04:43:59+5:30

सडोली (खालसा)‌ : साखर कारखान्याच्या हंगाम सांगता मिरवणुकीत कांडगाव परिसरातील ट्रॅक्टर चालकांनी, ऊसतोड कामगारांनी डाॅल्बीच्या ठेक्यावर नृत्यांगना नाचवल्या. त्यामुळे ...

Dancers danced by tractor drivers | ट्रॅक्टर चालकांनी नाचवल्या नृत्यांगना

ट्रॅक्टर चालकांनी नाचवल्या नृत्यांगना

Next

सडोली (खालसा)‌ : साखर कारखान्याच्या हंगाम सांगता मिरवणुकीत कांडगाव परिसरातील ट्रॅक्टर चालकांनी, ऊसतोड कामगारांनी डाॅल्बीच्या ठेक्यावर नृत्यांगना नाचवल्या. त्यामुळे कोल्हापूर - राधानगरी मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कांडगाव (ता. करवीर) येथून सुरू झालेली ही मिरवणूक तब्बल दोन तासांनी हळदीच्या मुख्य बसथांब्यावर आली. त्याठिकाणी मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर लावून डॉल्बीच्या मागे असणाऱ्या ट्रॉलीमध्ये नृत्यांगना नाचत होत्या. या सर्व प्रकाराबाबत संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महिला व सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

फोटो ओळ

साखर कारखाना हंगाम सांगता मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकांनी हळदी येथील मुख्य चौकात डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्यांगनांसोबत ठेका धरला.

माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्‍मार्टफोन वरून पाठवले.

Web Title: Dancers danced by tractor drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.