दादानंच मारलं मम्माला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:43 AM2017-09-08T00:43:25+5:302017-09-08T00:45:26+5:30

कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील पूजा रूपेश महाडिक (वय ३८) या विवाहितेच्या खुनावेळी उपस्थित असणाºया तिच्या साडेचार वर्षांच्या मुलीने ‘दादानंच मारलं मम्माला,’ असे गुरुवारी राजारामपुरी पोलिसांना चौकशीत सांगितले.

Dandananacha Marla Mammala .. | दादानंच मारलं मम्माला..

दादानंच मारलं मम्माला..

Next
ठळक मुद्दे मुलीचा जबाब : पूजा महाडिक खूनप्रकरणी संशयिताचा मोबाईल, लॅपटॉप जप्तया खून प्रकरणात मुलगीने संशयिताबद्दल पोलिसांना सांगितलेली माहिती व गवंडी यांचा जबाब या खून प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील पूजा रूपेश महाडिक (वय ३८) या विवाहितेच्या खुनावेळी उपस्थित असणाºया तिच्या साडेचार वर्षांच्या मुलीने ‘दादानंच मारलं मम्माला,’ असे गुरुवारी राजारामपुरी पोलिसांना चौकशीत सांगितले. अल्पवयीन संशयिताने फोटो काढण्याच्या कारणावरून हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. तरीही पोलीस सर्व दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेवेळी दुसºया इमारतीमध्ये गवंडीकाम करणाºया साक्षीदाराचा जबाबही नोंदविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, पोलिसांनी पूजा महाडिक यांच्या पॅराडाईज अपार्टमेंट येथील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर एफ ५०३ मध्ये घटनास्थळाचा गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा पंचनामा केला. यावेळी संशयिताची सॅक, त्यामधील दोन वह्या, मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला. तत्पूर्वी, सकाळी पूजा महाडिक यांच्यावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले. संशयितावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पोलिसांनी गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल निरीक्षणगृहात केली.
पोलिसांनी सांगितले की, ‘पूजा महाडिक या पती रूपेश, मुलगी यांच्यासोबत राहत होत्या. रूपेश हे एका कंपनीत नोकरीस आहेत. घराशेजारीच अल्पवयीन संशयित राहतो. गुरुवारी दुपारी महाडिक यांच्या घरामध्ये तो सॅक घेऊन घुसला. त्यावेळी त्या व त्यांची मुलगी या दोघीच होत्या. संशयित त्यांचे मोबाईलवरून फोटो काढू लागला. पूजा यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे संशयित त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करू लागला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केला. मात्र, संशयिताने त्यांच्यावर वार करून त्यांचा खून केला. घटनेनंतर संशयित त्या ठिकाणीच बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यांच्या आवाजामुळे अपार्टमेंटमधील लोक जमा झाले. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. पोलिसांनी जखमी अवस्थेत पूजा यांना खासगी रुग्णालयात नेले. रुग्णालयातउपचार सुरू असताना पूजा यांचा मृत्यू झाला.
पूजा यांच्या खूनप्रकरणी पती रूपेश रमेश महाडिक यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी घटनास्थळाचा पुन्हा एकदा पंचनामा केला. महाडिक यांच्या घरामधील हॉल व बाहेरील गॅलरीत रक्त पडले होते. या ठिकाणी संशयिताने आणलेली सॅक पोलिसांनी जप्त करून पंचनामा केला. या खूनप्रकरणी पोलीस संशयिताच्या मित्रांकडे चौकशी करीत असल्याचे समजते.

गवंड्याचा जबाब महत्त्वपूर्ण
साळोखे पार्क, भारतनगर परिसरातील एक गवंडी पॅराडाईज अपार्टमेंटशेजारील दुसºया अपार्टमेंटवर बुधवारी (दि. ६)
काम करीत होता. त्यावेळी त्याला आरडाओरड ऐकू आली. त्याने इकडे-तिकडे पाहिले तर त्याला हा प्रकार दिसून आला. त्याने संशयिताने विवाहितेला मारल्याचे पाहिले.त्यामुळे त्याचा जबाब गुरुवारी पोलिसांनी घेतला. या खून प्रकरणात मुलगीने संशयिताबद्दल पोलिसांना सांगितलेली माहिती व गवंडी यांचा जबाब या खून प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

घरचे संबंध
पूजा महाडिक यांच्या घराच्या भिंतीला लागूनच अल्पवयीन संशयिताचे घर आहे. त्यामुळे या कुटुंबाची महाडिक यांच्या घरात रोज ये-जा असे. संशयिताच्या घरामध्ये कोणी नसेल तर त्याला स्वत:च्या घरात महाडिक कुटुंबीय जेवण देत असत, असे घटनास्थळावरून सांगण्यात आले.

Web Title: Dandananacha Marla Mammala ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.