नदीकाठाला महापुराचा धोका; शेतजमिनीला कवडीमोलचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:48+5:302021-08-26T04:26:48+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : नदीकाठच्या मळीभागातील जमीन म्हणजे जणू काही तांबडं सोनचं म्हणावे.कसदार आणि पिकाऊ जमीन म्हणूनचं त्याची वेगळी ...

Danger of floods along the river; Loss of agricultural land | नदीकाठाला महापुराचा धोका; शेतजमिनीला कवडीमोलचा तोटा

नदीकाठाला महापुराचा धोका; शेतजमिनीला कवडीमोलचा तोटा

googlenewsNext

पोर्ले तर्फ ठाणे : नदीकाठच्या मळीभागातील जमीन म्हणजे जणू काही तांबडं सोनचं म्हणावे.कसदार आणि पिकाऊ जमीन म्हणूनचं त्याची वेगळी ओळखं आहे; पण महापुराच्या वाढत्या प्रभावामुळे वर्षानुवर्ष नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नदीकाठची शेती नको रे बाबा...म्हणण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यांवर आली आहे. महापुराचा धोका प्रत्येक वर्षी नदीकाठाला बसत राहिला तर नदीकाठी ऊस पिकं घेणे अवघड बनत आहे. परिणामी भविष्यात मळी भागातील शेतजमिनीचे दर उतरणीला लागलेले असतील.

जोमदार पीक आणि भरघोस उत्पन्नासाठी मळीभागातील जमीन असावी असे म्हटले जाते आणि ते काही खोटे नाही. वैरणीसाठी राखीव असलेला नदीकाठच्या क्षेत्रात चांगल्या ऊस दरामुळे अलीकडे प्रामुख्याने ऊसपीक घेतले जातं आहे. या क्षेत्रातील ऊसाला चांगला उतारा असल्यामुळे त्यास सर्वच गुऱ्हाळघर आणि साखर कारखान्याकडून मोठी मागणी असते. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी मळीभागातील शेतीच्या बळावर प्रगती साधली आहे.

अनेक पाणी योजनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जिरायत शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आली आहे. या शेतीच्या बळावर जिल्ह्यातील शेतकरी प्रगती साधत असल्याने कोल्हापूर जिल्ह्याची ‘सधन जिल्हा’ म्हणून नकाशावर आधोरिखित आहे. उसाच्या जोरावर प्रगतिपथावर झेपावणाऱ्या जिल्ह्यातील शेतीविकासाला तीन वर्षांनी आलेल्या महापुराने 'खो' घातला आहे. २०१९ चा महापुराचा मुक्काम जादा असल्याने उसाचे प्रचंड नुकसान झाले होते तर २०२१ च्या महापुरात मातीमिश्रीत गाळयुक्त पाण्याने बुडीत क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने कुजून वाया जात आहे. यापूर्वी तीन महापूर चौदा वर्षीच्या फरकाने येणारे महापुराचे भाकित एका वर्ष आड आलेल्या महापुराने फोल ठरविले आहे.त्यामुळे प्रत्येक वर्षी सारखाचं पाऊस लागत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी चाखला आहे. महापुराच्या संकटाने होणारे पिकांचे नुकसान शासनाच्या भरपाईपुढे तोकडे आहे. कारण उत्पादनखर्च आणि मिळणारी भरपाई याचा ताळेबंद लावताना शेतकऱ्यांच्या डोक्यावरची केले उभारत आहे. हेच अर्थिक बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे.

चौकट

वारंवार नुकसानीने जगणं मुश्किल

नदीकाठच्या मळीभागातील शेतीत पिके घेणे अडचणीचे बनले आहे. तीन वर्षांत दोनदा महापुराच्या संकट आल्याने नदीकाठचा शेतकरी नुकसानी गहिवरून जात आहे

.एकेकाळी सोन्याचा भराव मिळणाऱ्या नदीकाठच्या जमिनीचे दर उतरणीला लागले आहे. अशातचं यापुढे वारंवार नुकसान शेतकऱ्याच्या वाट्याला आले, तर जगणेचं मुश्किल होऊन जाणार आहे.

चौकट

पुरामुळे गेलेला ऊस काढून प्रत्येक वर्षी लागण करावी लागते. कमी दिवसात अपेक्षित उंची नसल्यामुळे पुरात बुडलेला ऊस कुजून जातो. ऊस जाण्याने किंवा हुमणी रोगामुळे मळीभागात प्रत्येक वर्षी लागण करावी लागते. मशागत, मुलूखची महाग खते तसेच वर्षभर कष्ट करून ऊस वाढविला जातो; परंतु महापुराच्या धोक्याने हातातोडांशी आलेले ऊस पीक कुजून वाया जातं आहे. प्रत्येक वर्षीच्या संकटाने नदीकाठची शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे ऊस पिकवला तर पुराने वाया जातो. नाही पिकविला तर उपाशी राहावं लागते, अशी अवस्था नदीकाठच्या शेतकऱ्यांची झाली आहे.

Web Title: Danger of floods along the river; Loss of agricultural land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.