आमजाई व्हरवडे येथील अंगणवाडीची धोकादायक इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:14 AM2021-03-30T04:14:03+5:302021-03-30T04:14:03+5:30
आमजाई व्हरवडे येथील मरगूबाई मंदिराशेजारी वीस वर्षांपूर्वी अंगणवाडी इमारत बांधली आहे. या अंगणवाडीत जवळपास वीस विद्यार्थी ...
आमजाई व्हरवडे येथील मरगूबाई मंदिराशेजारी वीस वर्षांपूर्वी अंगणवाडी इमारत बांधली आहे. या अंगणवाडीत जवळपास वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पावळ्यात या इमारतीत भिंती पाझरुन इमारतीत पाणी साचते. पावळ्यात तर लहान मुलांना दुसरीकडे बसवले जाते. पावसाळ्यात ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे.
प्रशासन लहान मुलांच्या जिवाशी किती दिवस खेळणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही इमारत बांधावी. कारण या इमारतीत आगामी शैक्षणिक वर्षात मुलांना पाठवून देण्याची मानसिकताच दिसत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ याची कार्यवाही करावी व जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.
चौकट
अनर्थ होण्याचा धोका
पावसाळ्यात पूर्ण इमारत पाण्याने तुंबत असल्याने कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा ही इमारतच काढावी, अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
कोट
अंगणवाडीची ही इमारत धोकादायक झाली आहे हे खरे आहे. या पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या इमारतीत बसवणार नाही पावसाळ्यापूर्वीच नवीन इमारतीसाठी पाठपुरावा करणार आहे.
आनंदराव कांबळे, सरपंच.
अंगणवाडीची इमारत धोकादायक झाली आहे. ही इमारत बांधावी, अन्यथा या इमारतीत आमची मुले पाठवणार नाही.
संदीप चौगले, पालक.