दुष्काळाचा फास आवळतोय!

By admin | Published: October 1, 2015 12:05 AM2015-10-01T00:05:08+5:302015-10-01T00:37:25+5:30

२0१४ मध्ये राधानगरी धरणक्षेत्रात ४ हजार ५0४ मिलिमीटर पाऊस पडला होता. यावर्षी त्यात घट होऊन २ हजार ६४२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Dangerous clutter is good! | दुष्काळाचा फास आवळतोय!

दुष्काळाचा फास आवळतोय!

Next

प्रकाश पाटील - कोपार्डे --यावर्षी पावसाने ओढ दिल्याने हातचा खरीप वाया गेला असतानाच कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. मोठे मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपासून २५ टक्क्यांपर्यंत ही घट आहे. मे २0१६ पर्यंत पिण्यासाठी पाणीसाठा पुरण्याची आशा असली तरी पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना दिल्या आहेत. एकूणच जिल्ह्यात दुष्काळाचे गडद सावट पसरत आहे. जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा हे चार मोठे प्रकल्प आहेत, तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगांव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा या आठ मध्यम प्रकल्पांसह ५३ लघू प्रकल्प आहेत. वर्ष २0१४-१५ मधील १ जून ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीतील पावसाची आकडेवारी पाहिल्यास धरण क्षेत्रात यंदा केवळ ६० टक्केच पाऊस झाल्याचे स्पष्ट होते. परतीच्या पावसानेही हजेरी लावलेली नाही.
२0१४ मध्ये राधानगरी धरणक्षेत्रात ४ हजार ५0४ मिलिमीटर पाऊस पडला होता. यावर्षी त्यात घट होऊन २ हजार ६४२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तुळशी धरणक्षेत्रात मागील वर्षी २ हजार ७९५ मि.मी. पावसाची नोंद झाली; पण यावर्षी १ हजार ४१0 मि.मी. पाऊस पडला आहे. वारणा धरणक्षेत्रात मागील वर्षी २ हजार ९१५ मि.मी. पावसाची नोंद आहे, तर यावर्षी यात तब्बल ५१ टक्के घट होऊन १ हजार ७६६ मि.मी. पाऊस झाल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत मोठे व मध्यम प्रकल्प १00 टक्के तुडुंब भरलेले होते. यावर्षी मोठ्या प्रकल्पांमध्ये
८६ टक्के पाणीसाठा आहे.
मध्यम प्रकल्पात यावर्षी ९0 टक्के पाणीसाठा आहे, तर मागील वर्षी तो ९७ टक्के होता. लघू पाटबंधाऱ्यामध्ये यावर्षी सरासरी ७३ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, मागील वर्षी तो ८४ टक्के होता. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर झाला नाही तर टंचाईस सामारे जावे लागणार आहे.

२४-९-२0१५ पर्यंतची आकडेवारी (तुलनात्मक)
मोठे प्रकल्प २0१५ मधील २0१४ मधील
आजचा पाणीसाठाटक्केवारी१ जूनपासूनचाआजचा पाणीसाठाटक्केवारी१ जूनपासूनचा
(द.ल.घ.मी) एकूण पाऊस मि.मी(द.ल.घ.मी) पाऊस मि.मी
राधानगरी२१६,८३९९२६८२२१५.७५९९४५0४
तुळशी७१.८८७८१४१0९१.७५१00२७९५
वारणा७१८.६७९२१४८२७७९.३४१00२९१५
दूधगंगा५११.७७५१७६६६७९.१११00२९४९
एकूण१५१९.0८८६७३00१७६८.0७१00१३१६३
मध्यम प्रकल्प २४-९-२0१५ अखेर तुलनात्मक
मध्यम प्रकल्प २0१५ मधील २0१४मधील
आजचा पाणीसाठाटक्केवारी१ जूनपासूनचा आजचा पाणीसाठाटक्केवारी१ जूनपासूनचा
(द.ल.घ.मी) एकूण पाऊस मि.मी(द.ल.घ.मी) पाऊस मि.मी
कासारी७७.४४९९२५७0७७.९६१00४५२७
कडवी७0.२९१00१६७0६९.६२९९३९९८
कुंभी७४.९१९८४४२१७६.0४९९५१३८
पाटगांव९६.२९९२३३३५१0४.७७१00४११७
चिकोत्रा२0.५२४६१२१७३२.६१७६१६३१
चित्री४३.३५८३१३८६५२.१९९९२५४९
जंगमहट्टी२८.६८८५१५१७३३.६५१00३३0४
घटप्रभा४३.५१९९३३३७४३.५१९९४५११
एकूण४५४.९९९0१९४५३४९0.३५९७२९७७५
लघू प्रकल्प २४-९-२0१५ अखेर तुलनात्मक
लघू प्रकल्प २0१५ मधील २0१४मधील
आजचा पाणीसाठा टक्केवारीआजचा पाणीसाठाटक्केवारी
(द.ल.घ.मी) (द.ल.घ.मी)
५६१३0.७७७३१५0.0९८४.१८


चिकोत्रा नदी कोरडी ठणठणीत
दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवे
कोल्हापूर जिल्हा पाण्याच्या बाबतीत सधन मानला जात असला, तरी यंदा पावसाने दडी मारल्याने चिकोत्रा धरणात अत्यल्प म्हणजे ४६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकेवाडा, बेळुंकी, हमीदवाडा, गलगले, लिंगनूर, कापशी यासह ३३ गावांच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह चिकोत्रा प्रकल्प प्रशासनाने चिकोत्रा धरणातील पाणी जून २०१६ पर्यंत पुरविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे.
केवळ उभ्या असणाऱ्या उसाला दोनवेळा पाणी देण्यात येणार आहे. चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्याची क्षमता दीड टी.एम.सी. इतकी आहे. आतापर्यंत २००८ व २०११ मध्ये दोनवेळाच हे धरण भरले होते. पण, यंदा पावसाअभावी ४६ टक्केच साठा झाला आहे. चिकोत्रा नदीद्वारे या खोऱ्यातील ३३ ते ३५ गावांच्या शेतीसह नागरिकांची तहान भागविली जाते.

उभ्या पिकांना केवळ दोन पाणी
चिकोत्रा धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे नदीतून शेतीसाठी पाणी मिळणे अशक्य आहे. केवळ उभ्या ऊस पिकांचे नुकसान होऊ नये, हाता-तोंडाचा शेतकऱ्यांचा घास वाया जाऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, त्यासाठी आगामी कालावधीमध्ये केवळ दोन पाणी या पिकांना मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, सध्या सुरू असणाऱ्या पूर्व हंगामी परिस्थितीत शेतीसाठी पाणी मिळणार नाही, यासाठी गावागावांत दवंडी, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून पाटबंधारे अधिकारी जनजागृती करीत आहेत.

उभ्या ऊसपिकांसाठी कधी पाणी सोडायचे याबाबत निश्चित धोरण ठरलेले नाही. मात्र, दोनवेळा सिंचनासाठी पाणी सोडून उर्वरित पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने ऊस लावणी करू नयेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे.
जे. वाय. सावंत, उपविभागीय अभियंता, चिकोत्रा पाटबंधारे विभाग...

पिकांच्या सर्वेक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिके वाळली; त्यामुळे परिस्थितीचा वस्तुस्थितिजन्य पंचनामा करण्याची मागणी असतानाही शासनाच्या कृषी व महसूल विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे.
महसूल प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश नाहीत, असे गोंडस उत्तर सांगून कृषी विभाग हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मदत मिळणार की नाही, असा सवाल शेतकऱ्यांतून होत आहे.
पिकांच्या ऐन परिपक्वतेच्या टप्प्यातच पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट झाली आहे. चंदगड, आजरा, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यांतील भात सोडून अन्य पिके चांगली आहेत. उर्वरित तालुक्यांत सर्वच पिके वाळली आहेत. बांधावरील व डोंगरकपारीतील गवताची वाढ झालेली नाही. यामुळे वैरणटंचाई निर्माण झाली आहे. उसाच्या टप्प्यात पाचटाचा वापर वैरणीसाठी केला जात आहे. वैरणीला सोन्याचा भाव आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
इतर ठिकाणांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे, असा शासकीय पातळीवरील अभिप्राय आहे. मात्र, १९७२ नंतर इतिहासात पहिल्यांदाच इतकी वाईट वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. पूर्ण दुष्काळ नसल्याने शासनाची मदत नाही आणि समाधानकारक पाऊस नसल्याने अपेक्षित उत्पादनही नाही, अशी परिस्थिती आहे.
ज्यावेळी पंचनामा होणे गरजेचे होते, यावेळी यंत्रणेने दुर्लक्ष केले. ‘अजून पावसाचे दिवस आहेत. पडेल पाऊस’, असे सांगत वेळ मारून नेली.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पिकांचा पंचनामा केला जाईल, असे सांगितले; मात्र अद्याप कृषी विभागाला आदेश नाहीत. सोयाबीन, ज्वारी, भुईमूग काढणी सुरू आहे.
त्यामुळे आता पंचनामा करूनही नेमकी परिस्थिती कशी समोर येणार, असा प्रश्न आहे.

Web Title: Dangerous clutter is good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.