आंब्यातील धाडसी दरोडा; अटक केलेल्या पाच जणांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:55 PM2021-12-10T19:55:55+5:302021-12-10T19:56:25+5:30

दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री तळवडे, आंबा (ता. शाहूवाडी) येथे शांतय्या शंकरय्या स्वामी यांच्या घरावर आठ ते नऊ दरोडेखोरांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने शांतय्या स्वामी व त्याच्या मुलाला मारून जखमी केले होते.

The daring robbery of the mango; Five arrested have been remanded in police custody till December 15 | आंब्यातील धाडसी दरोडा; अटक केलेल्या पाच जणांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

आंब्यातील धाडसी दरोडा; अटक केलेल्या पाच जणांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext

शाहूवाडी  : तळवडे, आंबा (ता. शाहूवाडी) येथे हातपाय बांधून, पिस्तुलाचा धाक दाखवून घातलेल्या धाडसी दरोड्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या पंधरा दिवसांत यश आले. पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून आणखी चौघे पसार आहेत. अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

सचिन रामचंद्र नाचणकर (वय ३७, रा. मु. पो. कोतोली, ता. शाहूवाडी), शिवाजी हरिबा कदम (३६, रा. अमेनी, ता. शाहूवाडी), मंदार तानाजी चोरगे (३७, रा. प्लॉट नं. ३०४, तिसरा मजला, अवधूत कार्टेक, भारती विद्यापीठानजीक, कात्रज, पुणे), नामदेव ऊर्फ अविनाश जालिंदर कदम (२६, रा. सध्या रा. पुणे, मूळ गाव पाडळेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली), शुभम ऊर्फ सोन्या शंकर चोरगे (२२, रा. वांगणी, ता. वेल्हा, जि. पुणे). अशी या पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री तळवडे, आंबा (ता. शाहूवाडी) येथे शांतय्या शंकरय्या स्वामी यांच्या घरावर आठ ते नऊ दरोडेखोरांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने शांतय्या स्वामी व त्याच्या मुलाला मारून जखमी केले. इतर महिलांचे हातपाय बांधून, तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांना खोलीत डांबले. दरोडेखोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लूट करून चारचाकी गाडी चोरून नेली होती. शाहूवाडी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून याचा तपास सुरू केला. दरोड्यातील संशयित आरोपी हे मलकापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून या पाच जणांना अटक केली होती.

Web Title: The daring robbery of the mango; Five arrested have been remanded in police custody till December 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.