‘सम्राट’च्या आयुष्यात अंधारच ! वैद्यकीय तपासणीत स्पष्ट : तात्याराव लहाने यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:04 AM2018-05-12T01:04:27+5:302018-05-12T01:04:27+5:30

Darkness in the life of 'Emperor' Medical examination explains: Explanation of Tatyarao Lahane | ‘सम्राट’च्या आयुष्यात अंधारच ! वैद्यकीय तपासणीत स्पष्ट : तात्याराव लहाने यांचे स्पष्टीकरण

‘सम्राट’च्या आयुष्यात अंधारच ! वैद्यकीय तपासणीत स्पष्ट : तात्याराव लहाने यांचे स्पष्टीकरण

Next

कोल्हापूर : अंध ‘सम्राट’च्या आयुष्यात उजेड पाडण्यासाठी चाललेली धडपड आज थांबली. दृष्टिहीन ‘सम्राट’च्या डोळ्यावर ज्येष्ठ वैद्यकिय शिक्षण सहसंचालक व प्रसिध्द नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी सम्राट पोळ या चारवर्षीय बालकाच्या डोळ्यांची तपासणी केली.

त्यावेळी त्यांनी सम्राट कधीही पाहू शकणार नसल्याचे स्पष्टीकरण देत त्याचे पिता युवराज पोळ व आजी मंगल पोळ यांची समजूत काढली. डॉ. लहाने यांच्या स्पष्टीकरणामुळे सम्राटच्या आजीला रडू कोसळले,गेले आठवडाभर ‘सम्राट’ला दृष्टी मिळवून देण्यासाठीअनेक हात कामाला लागले होते. सम्राटच्या भविष्यातील अंधार दूर करायचा हेच त्यांचे सर्वांचे ध्येय होते. पण या साºयांची धडपड आज थांबली अन् सम्राटच्या नशिबी अंधारच राहिला. अंबाबाई मंदिरात भिक्षा मागणाºया वृध्देचा निरागस नातू ‘सम्राट’ची उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे ससेहोलपट होत होती. त्यामुळे हे बालक दृष्टीहिन जीवन जगत होते.

‘लोकमत’ने ही धक्कादायक बाब वृत्तातून समाजासमोर मांडली अन् समाजाला मायेचा पाझर फुटला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर ‘सम्राट’ला दृष्टी मिळवून देण्यासाठी सर्व खर्चाची तसेच चेन्नई व हैदराबादला न्यावे लागले तर तीही नेण्याची तयारी दर्शवली. त्यादृष्टीने कोल्हापुरात ज्येष्ठ नेत्रोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांच्याकडे उपचार केले. त्यांनी दृष्टी मिळण्याची किंचितशी आशा दाखवली.

गुरुवारी प्रसिध्द नेत्रशल्यविशारद डॉ. लहाने यांनी ‘सम्राट’ची तपासणी केली. त्यांनी ‘सीपीआर’मध्ये सम्राटच्या डोळ्यावर तपासणी करुन वैद्यकीय अहवाल पाहिले. त्यावेळी ‘सम्राट’वर उपचार करण्यात खूप उशीर केल्याचे सांगून तो भविष्यात कधीही पाहू शकणार नसल्याचे सत्य उघड केले. त्यामुळे सम्राटच्या आजीला रडू कोसळले, तर वडील गहिवरुन गेले.

उपस्थितही गहिवरले
‘सम्राट’ला दृष्टी मिळवून देण्यासाठी अनेक हात धडपडत होते. पण डॉ. लहाने यांनी ‘सम्राट’पुढे अंधार असल्याचे स्पष्ट केल्याने अनेक गहिवरले.

 

‘सम्राट’च्या डोळ्यातील स्रायू अकुंचन पावल्याने त्याच्यावर जन्मानंतरच वर्ष-दीड वर्षातच उपचार करणे आवश्यक होते. सध्या त्याच्या मेंदू व डोळ्यातील स्नायूंचा संपर्क तुटल्याने तो कधीही पाहू शकणार नाही.
- डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकिय शिक्षण सहसंचालक

Web Title: Darkness in the life of 'Emperor' Medical examination explains: Explanation of Tatyarao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.