शिंगणापूरमध्ये गव्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:17+5:302020-12-29T04:24:17+5:30
कोपार्डे : शिंगणापूर येथे आज सकाळी ११ वाजता शेतात नांंगरट करीत असलेल्या भैया पाटील या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसमोरच ...
कोपार्डे : शिंगणापूर येथे आज सकाळी ११ वाजता शेतात नांंगरट करीत असलेल्या भैया पाटील या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसमोरच तीन गवे आले. बिनधास्त असलेल्या या गव्यांनी तेथून जवळ असणाऱ्या उसाच्या शेतात दडी मारली असून, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपूर्वी लक्षतीर्थ वसाहत व उत्तरेश्वर पेठ दरम्यान नागरिकांना दर्शन दिलेले गवे जंगलाकडे परतले नसल्याचे समोर आले आहे. यावेळी नागरिकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली होती; पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या गव्यांचा माग काढण्यात अपयश आले होतेे. यामुळे गवे जंंगलाकडे परतल्याचा अंंदाज वर्तवण्यात येत होता; पण आज सकाळी ११च्या दरम्यान पुन्हा शिंगणापूर येथील शेतात भैया पाटील हे शेतकरी नांगरट करीत असताना तीन गवे शेजारच्या उसाच्या शेतातून ट्रॅक्टरसमोर आले. गवे अगदी निर्धास्तपणे जात होते. ट्रॅक्टरच्या आवाजाने ते थोडे बिथरले. यानंतर भैया पाटील यांनी ते ट्रॅक्टरच्या दिशेने येऊ नयेत यासाठी मोठ्याने हॉर्न वाजविला व हाके घातले. यानंतर गव्यांनी शेजारच्या उसाच्या शेताचा आश्रय घेतला.
____________________________________
(फोटो)
शिंगणापूर (ता. करवीर) येथे साळोखे यांच्या शेतात नांगरट करताना शेतकरी भैया पाटील यांना तीन गव्यांचे दर्शन झाले.