Kolhapur Ambabai Mandir: 'अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवला'; गोव्यातून आला फोन अन् दर्शन थांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:25 PM2021-10-07T17:25:11+5:302021-10-07T17:43:29+5:30
Ambabai temple closed: कित्येक महिन्यांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली होती. घटस्थापनेदिवशीच दर्शन सुरु झाल्याने भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मंदिरात घातपात होण्याची धमकी मिळाल्याने भाविकांच्या आनंदावर पाणी फिरले आहे
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यभरासह कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर (Kolhapur Ambabai Mandir) भाविकांसाठी आजपासून खुले केले होते. मात्र. दुपारच्या सुमारास पोलिसांना एक निनावी फोन आल्याने सतर्कता म्हणून अंबाबाई मंदिरातील दर्श थांबविण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून मोठी धावपळ उडाली होती.
घातपात करण्याचा निनावी फोन आल्याने पोलिसांनी तातडीने दर्शनाची रांग थांबविली. यानंतर तातडीने मंदिराला वेढा घालत श्वान आणि बॉम्बशोधक पथकांना मंदिर परिसरात पाचारण करण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिसदेखील मंदिरात दाखल झाले आहेत.
कोल्हापूर : पोलिसांना निनावी फोन आल्याने अंबाबाई मंदिरातील दर्शन थांबवले आहे.पोलीस बंदोबस्त वाढवला असून पोलिसांची धावपळ उडाली आहे. pic.twitter.com/e4wVYz8xHX
— Lokmat (@MiLOKMAT) October 7, 2021
कित्येक महिन्यांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली होती. घटस्थापनेदिवशीच दर्शन सुरु झाल्याने भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मंदिरात घातपात होण्याची धमकी मिळाल्याने भाविकांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.