दत्रात्तय वारे यांचा जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:31+5:302021-06-06T04:18:31+5:30

कोल्हापूर - केवळ जिद्दीच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या एका वाडीवरील शाळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे शिक्षक दत्तात्रय वारे यांनी शनिवारी ...

Datrattay Ware's interaction with teachers in the district | दत्रात्तय वारे यांचा जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद

दत्रात्तय वारे यांचा जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद

Next

कोल्हापूर - केवळ जिद्दीच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या एका वाडीवरील शाळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे शिक्षक दत्तात्रय वारे यांनी शनिवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी संवाद साधला.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून या ऑनलाईन चर्चासत्राचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी याचे आयोजन केले होते. यादरम्यान एका पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील पडक्या दोन खोल्यातील शाळेला त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे नेले, याची माहिती वारे यांनी दिली.

गावासमोर आराखडा मांडल्यानंतर गावाने निधी कसा जमवून दिला, इथपासून आजही कोरोनाच्या काळात सकाळी ६ पासून ही शाळा ऑनलाईन पद्धतीने कशी सुरू असते, हे वारे यांनी यावेळी कोल्हापूरच्या शिक्षकांना सांगितले. याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी झोकून देऊन शिक्षणाचा दर्जा उंचवावा, असे आवाहन संजयसिंह चव्हाण यांनी यावेळी केले.

Web Title: Datrattay Ware's interaction with teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.