दत्त भांडारचा सौरऊर्जा उपक्रम प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:25+5:302021-04-02T04:23:25+5:30
शिरोळ : सध्या वीज निर्मितीचा प्रश्न भेडसावत आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतही कमी पडत आहे. नैसर्गिक सौरऊर्जेमुळे येणाऱ्या वीज वापरातही ...
शिरोळ : सध्या वीज निर्मितीचा प्रश्न भेडसावत आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतही कमी पडत आहे. नैसर्गिक सौरऊर्जेमुळे येणाऱ्या वीज वापरातही बचत होणार आहे. या सौर ऊर्जा संचामुळे वर्षाला साडेसात लाख रुपयांची बचत होणार आहे. हा संच दत्त भांडारने स्वखर्चाने उभारला असून, इतर संस्थांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. दत्त साखर कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दत्त भांडारमध्ये १४ लाख रुपये खर्चाच्या सौर ऊर्जा संचाचे उद्घाटन अध्यक्ष पाटील यांच्याहस्ते झाले. दत्त भांडारचे अध्यक्ष दामोदर सुतार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा विषद केला. यावेळी संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, महेंद्र बागे, संगीता पाटील-कोथळीकर, यशोदा कोळी, विनया घोरपडे, दरगू गावडे, अशोक कोळेकर, सदानंद घोरपडे, पी. व्ही. कुलकर्णी, सुहास मडिवाळ उपस्थित होते.
फोटो - ०१०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथील दत्त भांडारमध्ये अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.