जोतिबा डोंगरावर दत्त जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:15+5:302020-12-30T04:32:15+5:30
दत्त जयंती, मार्गशीष पौर्णिमा अशी पर्वणी असल्यामुळे भाविकांची अलोट गर्दी जोतिबा डोंगरावर झाली. मंदिर उघडण्याची वेळ वाढविल्यामुळे सकाळी सातपासूनच ...
दत्त जयंती, मार्गशीष पौर्णिमा अशी पर्वणी असल्यामुळे भाविकांची अलोट गर्दी जोतिबा डोंगरावर झाली. मंदिर उघडण्याची वेळ वाढविल्यामुळे सकाळी सातपासूनच भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. रात्रीपर्यंत भाविक दर्शन घेत होते. श्री दत्त मंदिरात रुद्राभिषेक, होमहवन विधी झाला. दुपारी दत्त देवाची उत्सव महापूजा बांधली. सायंकाळी सहा वाजता ‘दिगंबरा दिगंबरा’च्या जयघोषात दत्त जन्म काळ सोहळा मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. पुष्पवृष्टी, गुलालाची उधळण करण्यात आली. पाळणा गीत गायीले. सुंठवडा वाटप करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. प्रसाद वाटप झाला. डवरी गीते, भजन झाले. जयंती सोहळ्याचे नियोजन मिटके पुजारी समस्त केळीचा वाडा यांनी केले .
पौर्णिमा असल्याने भाविकांची अलोट गर्दी झाली. मंदिराबाहेर एकपदरी दर्शन रांग लागली. दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस , देवस्थान समितीचे कर्मचारी तैनात होते.
फोटो कॅप्शन_ दत्त जयंतीनिमित्त बांधण्यात आलेली श्री दत्त उत्सव महापूजा.