दत्तवाड अवैध व्यावसायिकांचा खाकीतील मित्र कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:15+5:302021-03-13T04:46:15+5:30

दत्तवाड कर्नाटक सीमेवर वसलेले गाव असून कुरुंदवाड पोलीस ठाण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. याचा फायदा अनेक अवैध व्यावसायिक घेत ...

Dattawad Who is the khaki friend of illegal traders | दत्तवाड अवैध व्यावसायिकांचा खाकीतील मित्र कोण

दत्तवाड अवैध व्यावसायिकांचा खाकीतील मित्र कोण

Next

दत्तवाड कर्नाटक सीमेवर वसलेले गाव असून कुरुंदवाड पोलीस ठाण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. याचा फायदा अनेक अवैध व्यावसायिक घेत आहेत. यापूर्वी गावात बनावट नोटा, गांजा विक्री, मटका, जुगार व सावकारकी यातून अनेकजण गब्बर झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात बंद असलेला गुटखा कर्नाटकातून बेकायदेशीरपणे आणून विक्री केला जात आहे.

जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार झाल्याने कुरुंदवाड पोलिसांनी अवैध व्यवसायाचा बिमोड करण्याचा विडा उचलला आहे. मात्र, दोनवेळा कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागले नाही.

शुक्रवारी गावातील काही गुटखा विक्रेते, अवैध दारू विक्री, मटका चालक यांच्यावर छापा टाकण्यात आला. मात्र, त्यांच्याकडे विशेष असे काहीच साहित्य मिळाले नाही. त्यामुळे कारवाईअभावी पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार झाल्यापासून गावातील अनेक अवैध व्यावसायिकांनी कर्नाटकाचा रस्ता धरला आहे. तर अनेक व्यावसायिकांनी जागा बदलली आहे. छापा पडणार याची कुणकुण लागल्यानेच व्यावसायिकांनी असा पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. तर अनेक व्यावसायिकांचे लागेबांधे वरपर्यंत असल्याने त्यांना वरूनच छाप्याची माहिती मिळत असल्याने व्यावसायिकांना पोलिसांच्या कारवाईचा धाकच राहिलेला नाही. यामुळे दत्तवाडातील अवैध व्यवसाय कायमचे बंद होणार का, तक्रार झाली की पंधरा दिवस बंद आणि पुन्हा नव्याने सुरू अशीच सुरू असलेली रीत पुढे सुरू राहणार, असे प्रश्न ग्रामस्थांतून विचारले जात आहेत.

Web Title: Dattawad Who is the khaki friend of illegal traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.