माधवी गवंडी कोल्हापूरच्या महापौरपदी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 02:29 PM2019-07-02T14:29:53+5:302019-07-02T14:34:08+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. महापौरपदावर आजपर्यंत कोल्हापूर शहरातील व्यक्ती विराजमान झाल्या.

The daughter of Karnataka, the Mayor of Kolhapur | माधवी गवंडी कोल्हापूरच्या महापौरपदी बिनविरोध

माधवी गवंडी कोल्हापूरच्या महापौरपदी बिनविरोध

googlenewsNext
ठळक मुद्देमाधवी गवंडी यांना बहुमान निवड जाहीर होेताच जल्लोष

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. महापौरपदावर आजपर्यंत कोल्हापूर शहरातील व्यक्ती विराजमान झाल्या.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सरीता मोरे यांनी राजीरामा दिला होता. रिक्तपदाकरीता मंगळवारी महापौरपदाची निवडणुक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पिठासन अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. महापौरपदाकरीता माधवी प्रकाश गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड अपेक्षित होती.

सभेचे कामकाज सुरु होताच पिठासन अधिकारी मित्तल यांनी निवडणुक कार्यक्रमाचे वाचन केले. निवडणुक प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरीता पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. हा अवधी संपताच मित्तल यांनी माधवी गवंडी यांची महापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच गवंडी समर्थकांनी महापालिकेसमोर वाद्यांच्या गजरात गुलाल उधळून तसेच फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला. अमन मित्तल, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर सरीता मोरे, हसिना फरास, शोभा बोंद्रे यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी गवंडी यांचे अभिनंदन केले.

निवड झाल्यानंतर नूतन महापौर माधवी गवंडी यांनी लागलीच कार्यालय प्रवेश करुन कामकाजाला सुरवात केली. मधुरिमाराजे छत्रपती, वैशाली क्षीरसागर, सायरा हसन मुश्रीफ, नबीला आबीद मुश्रीफ, माजी महापौर सरीता मोरे, हसिना फरास, अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी गवंडी समर्थकांनी नूतन महापौरांची महापालिका चौक ते शुक्रवार पेठ या मार्गावरुन सवाद्य मिरवणुक काढली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळणही केली.

निवडणुक सभा उशिरा सुरु

महापालिकेच्या सभा तब्बल तास दिड तास उशिरा सुरु होतात. त्याला महापौरपदाची निवडणुक होणार असलेली विशेष सभा अपवाद असते. परंतु मंगळवारची सभाही चौदा मिनिटे उशिरा सुरु झाली. सकाळी अकरा वाजताची सभा असल्याने पिठासन अधिकारी अमन मित्तल साडेदहा वाजण्यापूर्वीच महापालिकेत पोहचले. परंतु सभागृहात यायला त्यांना ११ वाजून १२ मिनिटे लागली. सर्वच सदस्यही दहा मिनिटे उशिराच सभागृहात पोहचले.

 

 

Web Title: The daughter of Karnataka, the Mayor of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.