इचलकरंजीत डोक्यात गज घालून मुलीने केला बापाचा खून, मुलगी व आई पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:32 PM2022-02-23T12:32:52+5:302022-02-23T12:38:37+5:30

वाद इतका टोकाला गेला की, त्यांची मोठी मुलगी साक्षी हिने त्यांच्या टोक्यात लोखंडी गजाने वर्गी घाव घातला

daughter kills father In Ichalkaranji, Daughter and mother in police custody | इचलकरंजीत डोक्यात गज घालून मुलीने केला बापाचा खून, मुलगी व आई पोलिसांच्या ताब्यात

इचलकरंजीत डोक्यात गज घालून मुलीने केला बापाचा खून, मुलगी व आई पोलिसांच्या ताब्यात

Next

इचलकरंजी : येथील केटकाळे मळ्यात कौटुंबिक वादातून मुलीने वडिलांच्या डोक्यात लोखंडी गज घालून निर्घृण खून केला. शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे (वय ४०, रा. बर्गे मळा, इचलकरंजी) असे मृत पित्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. संशयित साक्षी शांतीनाथ केटकाळे (वय २१) व मुलीची आई सुजाता केटकाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चंदूर (ता. हातकणंगले) कडे जाणाऱ्या बर्गे मळा परिसरात शांतीनाथ केटकाळे कुटुंबासह राहत असून त्यांना तीन मुली आहेत. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शांतीनाथ केटकाळे यांचा कुटुंबासोबत काही कारणामुळे वाद निर्माण झाला. वाद इतका टोकाला गेला की, त्यांची मोठी मुलगी साक्षी हिने त्यांच्या टोक्यात लोखंडी गजाने वर्गी घाव घातला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूचा चेंदामेंदा झाला होता.

यावेळी घरातून मोठा आरडाओरडा ऐकू येत होता. हे ऐकताच भागातील नागरिक घरात गेले.  त्यानंतर तत्काळ केटकाळे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर आयजीएम हॉस्पिटलमध्ये आणले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी घटनास्थळी व आयजीएम हॉस्पिटलला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरा मुलीच्या आईस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समजते.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत ताबडतोब संशयित मुलीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत आयजीएम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनाचे काम सुरू होते. पोलिसांनी कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत सविस्तर माहिती व स्पष्टता नव्हती.

Web Title: daughter kills father In Ichalkaranji, Daughter and mother in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.