दौलत- अथर्वची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:24 AM2021-04-18T04:24:14+5:302021-04-18T04:24:14+5:30

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याने सन २०२०-२१ या गळीत हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण उसाची ...

Daulat- Atharva credits all sugarcane bills to farmers' accounts | दौलत- अथर्वची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

दौलत- अथर्वची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Next

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याने सन २०२०-२१ या गळीत हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. या गळीत हंगामामध्ये ४ लाख ३१ हजार ४४६ मे. टन उसाचे गाळप होऊन १२.१० टक्के साखर उताऱ्याने ५ लाख २२ हजार २८० क्विंटल पांढऱ्या साखर पोत्यांचे उत्पादन झाले. २०२०-२१ या हंगामात निव्वळ एफ.आर.पी. प्र. टन रु. २७५९.३० इतकी आहे. हंगामात गाळप झालेल्या संपूर्ण उसाची बिले, तोडणी वाहतूकदारांचीही बिले वेळेत व्यवस्थापनाने उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेली आहेत. तसेच या हंगामात डिस्टीलरी प्रकल्पामधून ५२ लाख ९० हजार ब. लिटर रेक्टीफाईड स्पिरीटचे उत्पादन झाले आहे. पुढील २०२१-२२ हंगामामध्ये इथेनॉल निर्मिती करण्याचा व्यवस्थापनाचा मानस असून, त्या दृष्टीने डिस्टीलरीचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने आपल्या संपूर्ण उसाचे व वाहनमालकांनी आपल्या वाहनांचे करार करण्यासाठी संबंधित गट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही खोराटे यांनी केले आहे.

फोटो ओळी:-- मानसिंग खोराटे, अध्यक्ष, अथर्व इंटरट्रेड.

Web Title: Daulat- Atharva credits all sugarcane bills to farmers' accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.