‘दौलत’च्या थकबाकीसाठी ‘पाटबंधारे’ची जिल्हा बँकेकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:39 AM2019-03-08T11:39:11+5:302019-03-08T11:41:10+5:30

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या एकाही कंपनीने पाणीपट्टी न भरल्याने थकबाकीचा आकडा ९७ लाखांवर गेला आहे. या रकमेच्या वसुलीसाठी कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळाच्या दक्षिण विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे धाव घेतली.

For the 'daulat' dues, 'District of Irrigation' has come to the bank | ‘दौलत’च्या थकबाकीसाठी ‘पाटबंधारे’ची जिल्हा बँकेकडे धाव

‘दौलत’च्या थकबाकीसाठी ‘पाटबंधारे’ची जिल्हा बँकेकडे धाव

Next
ठळक मुद्दे‘दौलत’च्या थकबाकीसाठी ‘पाटबंधारे’ची जिल्हा बँकेकडे धावकारखान्याकडे २००५ पासून पाणीपट्टी थकीत: ९७ लाख २४ हजारांची रक्कम

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या एकाही कंपनीने पाणीपट्टी न भरल्याने थकबाकीचा आकडा ९७ लाखांवर गेला आहे. या रकमेच्या वसुलीसाठी कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळाच्या दक्षिण विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे धाव घेतली.

ही रक्कम या कंपन्यांकडून वसूल करून द्यावी अथवा कंपनीसोबतच्या करारात पाटबंधारेच्या थकबाकीचा आकडा समाविष्ट करून ती रक्कम जमा करावी, अशी विनंती करणारे पत्रच ‘पाटबंधारे’च्या उपअभियंत्यांनी बँक प्रशासनाला दिले आहे.

दौलत कारखाना न्यूट्रियंट्स कंपनीने भाडेकराराने चालविण्यास घेतला होता. चालविण्यास घेण्यापूर्वी कारखान्याच्या इतर थकबाकीपैकी २००५ पासूनची ७५ लाख २९ हजार रुपये इतकी बिगरसिंचन पाणीपट्टी थकीत होती. याबाबत जलसंपदा विभागाकडून वारंवार सूचनाही दिल्या, पण कारखाना प्रशासनाने ती रक्कम भरली नव्हती.

दरम्यानच्या २०१६ पासून न्यूट्रियंट्स कंपनीने हा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यास घेतला. कंपनीच्या कालावधीत २९ लाख ९५ हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली. कंपनीने ही रक्कम भरली नसल्याने हा थकीत आकडा ९७ लाख २४ हजारांवर पोहोचला आहे.

वास्तविक कारखाना भाडेकराराने देतानाच करारपत्रात इतर थकबाकीप्रमाणे पाणीपट्टी थकीत रक्कम समाविष्ट करणे गरजेचे होते; पण बँकेने ते केलेले नव्हते. त्यामुळे ही रक्कम भरण्यास न्यूट्रियंट्स कंपनीने नकार दिल्याने थकबाकीपैकी एक रुपयाही वसूल होऊ शकला नाही.

आता हा कारखाना अथर्व शुगर्स या नव्या कंपनीकडे चालविण्यास दिला जाणार आहे. त्यांच्या सोबतच्या करारातही याचा समावेश करणे आवश्यक असल्याचे पत्र पाटबंधारे कार्यालयाने बँकेकडे पाठविले आहे.

कंपनीकडून शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून सिंचनासाठी म्हणून कपात केलेली सात लाख ५० हजारांची रक्कम ‘पाटबंधारे’कडे भरणे आवश्यक होते; पण कंपनीने हे भरलेले नाहीत, याकडेही पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

तांबाळे कारखान्याकडे ४८ लाखांची पाणीपट्टी थकीत

तांबाळे येथील इंदिरा सहकारी साखर कारखान्याचीही ४८ लाख ३२ हजारांची पाणीपट्टी गेल्या १५ वर्षांपासून थकलेली आहे. अथणी शुगर्सने हा कारखाना भाडेकराराने चालवण्यास घेतला आहे. त्यांनीदेखील ही मागील थकीत रक्कम भरलेली नाही. यासंदर्भात पाटबंधारे कार्यालयाने प्रादेशिक साखर सहसंचालक व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून ऊस बिलातून रक्कम वसूल करून द्यावी अशी विनंती केली आहे.
 

 

Web Title: For the 'daulat' dues, 'District of Irrigation' has come to the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.