विवाह सोहळ्यानिमित्त डवंग परिवाराने स्वीकारले १०० विद्यार्थ्यांचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:08+5:302021-04-07T04:25:08+5:30
सुधीर यांनी स्वकष्टातून स्वतःची पुणे येथे ‘कायझेन इंडस्ट्रीज’ उभी केली आहे, तर ‘राजश्री’ या इंजिनियर आहेत. पूर्वसूचनेनुसार ...
सुधीर यांनी स्वकष्टातून स्वतःची पुणे येथे ‘कायझेन इंडस्ट्रीज’ उभी केली आहे, तर ‘राजश्री’ या इंजिनियर आहेत. पूर्वसूचनेनुसार लग्न सोहळ्यात कोणीही आहेर आणले नव्हते, तर शैक्षणिक आहेर दिले जात होते, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना. पुरोगामी विचाराने झालेल्या या विवाह सोहळ्याबाबत पंचक्रोशीत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गेल्या नऊ - दहा महिन्यांमध्ये सह्यगिरी संस्थेमार्फत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले गेले आहे. या सर्वाची दखल घेऊन, विवाह सोहळ्यातील खर्चाला फाटा देऊन संस्थेच्या या सामाजिक कार्यासाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. या समाजोपयोगी ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पी. जी. शिंदे, माजी सभापती एकनाथ शिंदे, बापूसोा डवंग, सारंग डवंग, सर्जेराव शिंदे, सरपंच स्वप्नील शिंदे, सह्यगिरी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे आदी उपस्थित होते.