निवृत्तीदिवशीच दोघांना मिळाली पेन्शनची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:12+5:302020-12-12T04:40:12+5:30
कोल्हापूर : येथील क्षेत्रीय भविष्यनिधी कार्यालयाने नोव्हेंबर २०२० मध्ये निवृत्त झालेल्या दोघा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीदिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर देऊन ...
कोल्हापूर : येथील क्षेत्रीय भविष्यनिधी कार्यालयाने नोव्हेंबर २०२० मध्ये निवृत्त झालेल्या दोघा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीदिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर देऊन सुखद धक्का दिला. साहाय्यक भविष्यनिधी आयुक्त मुकुल पाटगावकर यांच्या हस्ते जयश्री सिद्धनाथ केसरकर व सखाराम भागोजी लांबोरे यांना पेन्शन पेमेंट ऑर्डर अदा करण्यात आल्या.
केसरकर या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेतून तर लांबोरे या आचल कॅश्यू कंपनीत नोकरीस होते. या कार्यक्रमास दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लेखाधिकारी नितीन पाटणकर यांनी स्वागत केले व प्रयास पेन्शन योजनेची माहिती दिली. या कार्यालयामार्फत यापूर्वीही निवृत्तीदिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर अदा करण्यात येत असे; परंतु कोरोनामुळे ते स्थगित केले होते. निवृत्तीदिवशीच पेन्शन पेमेंट द्यायचे असेल तर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व फंडाची वर्गणी आगाऊ भरून त्यासंबंधातील कागदपत्रांची पूर्तता केल्यास आणखी जास्त संख्येने या योजनेचा लोकांना लाभू मिळू शकेल. कंपनी व सभासद यांच्या सहकार्याशिवाय ही योजना यशस्वी होत नाही. लेखाधिकारी प्रशांत जमदग्नी यांनी आभार मानले.
(विश्वास पाटील)