दिव्यांग दिवस : पाच तास पॅराग्लायडिंग करत दृष्टिदिव्यांग झेपावले हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 02:40 PM2018-12-03T14:40:21+5:302018-12-03T14:45:34+5:30

बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा या महाराष्ट्र गीतात कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गगनभेदि गिरिविण अपुनच जिथे उणे, आंकाक्षापुढति जिथे गगन ठेंगणे या काव्यपंक्तिची अनुभूती तीन दृष्टिदिव्यांगांनी पॅराग्लायडिंग करत हवेत झेपावत घेतली.

Daylighting Day: Five hours paragliding should be visible in sight | दिव्यांग दिवस : पाच तास पॅराग्लायडिंग करत दृष्टिदिव्यांग झेपावले हवेत

दिव्यांग दिवस : पाच तास पॅराग्लायडिंग करत दृष्टिदिव्यांग झेपावले हवेत

Next
ठळक मुद्देपाच तास पॅराग्लायडिंग करत दृष्टिदिव्यांग झेपावले हवेतहवाई सफरीचा घेतला आनंद : कोल्हापूरच्या सतिश नवलेंची संकल्पना

संदीप आडनाईक

कोल्हापूर : बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा या महाराष्ट्र गीतात कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गगनभेदि गिरिीविण अपुनच जिथे उणे, आंकाक्षापुढति जिथे गगन ठेंगणे या काव्यपंक्तिची अनुभूती तीन दृष्टिदिव्यांगांनी पॅराग्लायडिंग करत हवेत झेपावत घेतली.

जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने पुण्याजवळील कामशेतच्या परिसरात प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड आणि निर्वाणा अ‍ॅडव्हेंचर्समार्फत तीन दृष्टिदिव्यांगासह पाचजणांनी पॅराग्लायडिंगचा अनुभव घेतला. प्रेरणाचे प्रमुख सतिश नवले यांनी दहा वर्षापूर्वी ही संकल्पना मांडली होती. तिला निर्वाणा अ‍ॅडव्हेंंचर्सचे संजय राव यांनी पाठबळ दिले.



कामशेतपासून १0 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीमध्ये कोल्हापूरचे सतिश नवले, पुण्याचे मिलिंद कांबळे आणि पूनम खुळे या तीन दृष्टिदिव्यांगानी पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने जवळपास १000 फूट उंच हवेत पाच तास विहरण्याचा आनंद घेत दिव्यांग दिवस साजरा केला. त्यांच्यासोबत सुनील रांजणे आणि शिवाजी करडे या डोळस व्यक्तींनीही हवेत विहार करण्याचा आनंद घेतला.


या साहसी उपक्रमासाठी निर्वाणाचे रवि शेलार, विनोद आणि बाळू या पायलटनी या दृष्टिदिव्यांगाना सहाय्य केले. सकाळी ८.३0 वाजता त्यांनी पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने पहिली झेप घेतली.

दुपारी १.३0 वाजेपर्र्यत सर्वांनी या साहसाचा अनुभव घेतला. लेफ्ट आणि राईट कंट्रोल कसे करायचे, वॉकी टॉकीचा वापर तसेच वातावरणातील बदल कसे झेलायचे याचे पूर्वप्रशिक्षण नसतानाही या दिव्यांगांनी १00 हून अधिक प्रत्यक्षदर्शीच्या उपस्थितीत हा थरार अनुभवला.



पूनमने केले थेट रस्त्यावर लँडिंग

या उपक्रमात सहभागी झालेल्या पूनम खुळे ही दृष्टिदिव्यांग तरुणी पॅराग्लायडिंग करत थेट रस्त्यावर उतरली. इतर दोघे मात्र दरीच्या वर सपाट भागात उतरले.
 



आम्ही जेव्हा हवेत झेप घेतली, तेव्हा त्यातील गंमत आम्ही अनुभवली. काही मर्यादा होत्या, पण आम्हा दृष्टिदिव्यांगाना पॅराग्लायडिंगची भीती वाटली नाहे. अशा साहसी उपक्रमात सहभागी झाल्याने उलट आमचा आत्मविश्वास वाढला.
सतिश नवले,
प्रमुख,
प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड

Web Title: Daylighting Day: Five hours paragliding should be visible in sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.