‘उत्कृष्ट युवा मंडळ’ पुरस्कार अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:27+5:302021-02-12T04:22:27+5:30
कोल्हापूर : नेहरू युवा केंद्र, संगठनमार्फत प्रत्येकवर्षी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट युवा मंडळ’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याकरिता गुरुवार (दि. १८) ...
कोल्हापूर : नेहरू युवा केंद्र, संगठनमार्फत प्रत्येकवर्षी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट युवा मंडळ’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याकरिता गुरुवार (दि. १८) पर्यंत मुदत आहे. इच्छुक युवा मंडळे व महिला मंडळांनी प्रस्ताव सविस्तर माहितीसह नेहरू युवा केंद्राकडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा मंडळास जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशा तीन पातळीवर पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा पातळीवर निवड केलेल्या युवा मंडळास २५ हजार रुपये, राज्य पातळीवर १ लाख रुपये, राष्ट्रीय पातळीवर प्रथम ५ लाख रुपये, दि्वतीय ३ लाख रुपये, तृतीय २ लाख रुपये अशी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पुरस्कारासाठी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील कार्याचे मूल्यमापन केले जाते.