ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:19+5:302021-03-07T04:21:19+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा या ऑफलाईन की ऑनलाईन द्यायच्या याची माहिती विद्यार्थ्यांकडून भरून घेतली जात आहे. ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा या ऑफलाईन की ऑनलाईन द्यायच्या याची माहिती विद्यार्थ्यांकडून भरून घेतली जात आहे. माहिती अद्ययावत करण्यासाठी शुक्रवार (दि. १२)पर्यंतची मुदत देण्यात आल्याचे शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे. या ऑनलाईन माहिती भरण्याच्या प्रक्रियेतून मात्र एमबीए, इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, अभियांत्रिकी हे व्यावसायिक अभ्यासक्रम मात्र वगळण्यात आल्याने त्यांनी अर्ज करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर माहिती अद्ययावत करण्याची लिंक देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा दोन्ही पद्धतींनी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरसह सर्व माहिती वेबसाईटवर अपडेट करून घेतली जात आहे. अर्ज भरण्यासाठी विभाग, अधिविभागात जायला लागू नये, नाहक गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे परीक्षा विभागाने कळविले आहे.