पी.एचडी.चे प्रबंध सादर करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:29+5:302021-05-26T04:25:29+5:30
कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेअंतर्गत विविध विषयांवर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडून एम. फिल., पी.एचडी.चे संशोधन सुरू आहे. सलग दुसऱ्यावर्षी ...
कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेअंतर्गत विविध विषयांवर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडून एम. फिल., पी.एचडी.चे संशोधन सुरू आहे. सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने या संशोधक विद्यार्थ्यांना फिल्डवर जावून माहिती घेणे, संशोधन करणे शक्य होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे एम. फिल., पी.एचडी.चे प्रबंध सादर करण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून सुरू होती. याबाबत काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक निकष लक्षात घेऊन विद्यापीठाने प्रबंध सादर करण्यास दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे परिपत्रक कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सोमवारी काढले आहे. या परिपत्रकाद्वारे संशोधक विद्यार्थी, मार्गदर्शक, शिक्षकांना या मुदतवाढीची माहिती दिली आहे.