वंचित एच.आय.व्ही.बाधितांना मिळणार दिशा! ‘लिंकेज लॉस’ मोहीम : जिल्ह्यातील २२ हजारांचा शोध घेणार; आॅक्टोबरपर्यंत मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:36 AM2018-08-12T00:36:43+5:302018-08-12T00:36:49+5:30

कोल्हापूर जिल्ह्णात २०१४ पासून ए.आर.टी. पासून वंचित राहिलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी ‘मॉप अप’ ही लिंकेज लॉस मोहीम शासनाच्यावतीने राबविली जाणार आहे.

 Deaf and HIV infected men get directions! Linkage Loss Campaign: Will Investigate 22,000 In The District Campaign to Oct. | वंचित एच.आय.व्ही.बाधितांना मिळणार दिशा! ‘लिंकेज लॉस’ मोहीम : जिल्ह्यातील २२ हजारांचा शोध घेणार; आॅक्टोबरपर्यंत मोहीम

वंचित एच.आय.व्ही.बाधितांना मिळणार दिशा! ‘लिंकेज लॉस’ मोहीम : जिल्ह्यातील २२ हजारांचा शोध घेणार; आॅक्टोबरपर्यंत मोहीम

Next

गणेश शिंदे ।
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णात २०१४ पासून ए.आर.टी. पासून वंचित राहिलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी ‘मॉप अप’ ही लिंकेज लॉस मोहीम शासनाच्यावतीने राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गंत एच.आय.व्ही. बाधितांचा शोध घेण्यात येणार आहे; त्यामुळे वंचित एच.आय.व्ही. बाधितांना दिशा मिळणार आहे. सध्या जिल्ह्णामध्ये साधारणत: २२ हजार एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आहेत. ही मोहीम आॅक्टोबर २०१८ अखेर राबविली जाणार आहे.
राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्णातील एच.आय.व्ही. बाधितांची संख्या लक्षणीय आहे. गेली काही वर्षे नवीन एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आढळल्यास त्यांना औषधोपचारांबरोबर त्यांच्या आरोग्यविषयक व विविध शासकीय सायी-सुविधा पुरविण्यासाठी केंद्रस्तरावर राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हास्तरावर जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण पथकाद्वारे हे काम केले जाते. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत एच.आय.व्ही. तपासणी व समुपदेशन केले जाते. एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आढळल्यास त्याचे आयुर्मान वाढविण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे ठरते. ए.आर.टी. नावाची औषधप्रणाली सुरू केल्यास त्या रुग्णाचे आयुर्मान वाढण्यास मदत होते, अशी एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीची सी.डी.फोर, सी.बी.सी. इत्यादी तपासण्या करून औषधप्रणाली सुरू केली जाते.
याचबरोबर बाधित व्यक्तीच्या जोडीदाराचीसुद्धा तपासणी करणे गरजेचे असते; पण काही रुग्ण एच.आय.व्ही. तपासणीनंतर अहवाल घेण्यासाठी आय.सी.टी.सी.कडे येत नाहीत. ए.आर.टी. केंद्रात नाव नोंदवून परत फिरकत नाहीत, तर काही रुग्ण विविध कारणांमुळे मध्येच औषध घेणे सोडून देतात. ए.आर.टी. केंद्राकडे येण्यास टाळाटाळ करतात. काहीजण चुकीचे पत्ते, फोन नंबर देतात; यासाठी आर्थिक परिस्थिती, औषधांबद्दल व आजाराबद्दल असणारे गैरसमज, सामाजिक भीती, आजाराकडे दुर्लक्ष, औषधांचे दुष्परिणाम अशी कारणे आहेत. सीपीआरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्णामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.


अशी राहणार प्रक्रिया
रुग्ण सापडल्यानंतर त्याचे समुपदेशन करून ए.आर.टी. केंद्राकडे संदर्भित केले जाणार आहेत. स्वत: कर्मचारी ए.आर.टी. केंद्राकडे रुग्णास घेऊन जातील व सी.डी.फोर, सी.बी.सी. सारख्या तपासण्या करून औषधोपचार सुरू केले जाणार आहेत.

यांची मदत...
आय.सी.टी.सी. समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
ए.आर.टी. कर्मचारी, स्वयंसेवी संस्था
ए.एन.एम., आरोग्य सेवक,
अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका

या ठिकाणी सेवा उपलब्ध...
सीपीआर रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, लोटस मेडिकल फौंडेशन
कोल्हापुरातील ए. आर. टी. केंद्र,
इचलकरंजीतील आय. जी. एम.
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय

यांचा घेतला जाणार शोध
जे.आय.सी.टी.सी.चा एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह अहवाल घेऊन पुढील उपचारासाठी ए.आर.टी.ला गेलेले नाहीत.
ए.आर.टी. केंद्रात गेले आहेत; परंतु नावनोंदणी करून पुन्हा आलेले नाहीत किंवा काहीनी औषध घेणे मधेच सोडून दिलेले आहे.
 

एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींना समुपदेशनाबरोबर ए.आर.टी. औषध सुरू करण्यात येईल. पूर्वीसारखी सी.डी.फोरची अट न घालता प्रत्येक एच.आय.व्ही. बाधितांना औषधप्रणाली चालू केली जाते. तसेच संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना यांसारख्या शासकीय योजनादेखील मिळवून दिल्या जातात. जे एच.आय.व्ही. बाधित रुग्ण ए.आर.टी.ला पोहोचलेले नाहीत, त्यांनी नजीकच्या सरकारी रुग्णालयाशी अथवा ए.आर.टी. केंद्राशी संपर्क साधावा.
- दीपा शिपूरकर,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, कोल्हापूर.

Web Title:  Deaf and HIV infected men get directions! Linkage Loss Campaign: Will Investigate 22,000 In The District Campaign to Oct.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.