मुहूर्ताच्या सौद्यात ‘कोल्हापूरी’ गूळाला ५१०० रूपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:40 PM2019-04-06T14:40:14+5:302019-04-06T14:41:19+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळाचा सौदा काढण्यात आला. यावेळी गूळाला सर्वाधिक प्रतिक्विंटल ५१०० रूपये दर मिळाला. हंगाम संपत आल्याने गूळाची आवक कमी
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळाचा सौदा काढण्यात आला. यावेळी गूळाला सर्वाधिक प्रतिक्विंटल ५१०० रूपये दर मिळाला. हंगाम संपत आल्याने गूळाची आवक कमी होत आहे.यंदा ऊसाचे उत्पादनात घट झाल्याने साखर कारखान्यांचे हंगाम फेब्रुवारीतच थंड झाले. त्याचा थेट परिणाम गुºहाळघरावरही झाल्याने यंदा फेबु्रवारी महिन्यापर्यंत गुºहाळघरांचा हंगाम बंद झाला. त्यानंतर किरकोळ किरकोळ आवक बाजार समितीत सुरू आहे. गेल्या वर्षी मार्च अखेर बाजार समितीत २१ लाख ९४ हजार ३८६ गूळ रव्यांची आवक झाली होती. यंदा त्यात १ लाख २६ हजार गूळ रव्यांची घट झाली आहे. आवक कमी असली तरी दर फारसा चांगला मिळाला असेही नाही. साखरेचे दर घसरत गेल्याने गूळालाही फटका बसला.कोल्हापूर बाजार समितीत कर्नाटक, सांगलीतून ही गूळाची आवक होते. साधारणता में महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आवक सुरू होते.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळाचा सौदा सभापती बाबासो लाड यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी मोहन सालपे, दशरथ माने, परशराम खुडे, आशालता पाटील, शारदा पाटील, संगीता पाटील, नानासो पाटील, संजय जाधव आदी उपस्थित होते. (फोटो-०६०४२०१९-कोल-बाजार समिती)