मृत्युंजयदूतांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:48+5:302021-09-27T04:25:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : रस्ते अपघातातील जखमींना महामार्ग मृत्युंजयदूतांनी अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित करावे. त्यामुळे ...

Death angels should treat the injured immediately | मृत्युंजयदूतांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून द्यावेत

मृत्युंजयदूतांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून द्यावेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उचगाव : रस्ते अपघातातील जखमींना महामार्ग मृत्युंजयदूतांनी अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित करावे. त्यामुळे मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होईल, असे मत सपोनि चंद्रकांत शेडगे (प्रभारी अधिकारी) यांनी केले.

उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने आयोजित मृत्युंजयदूत, वाहनचालक यांच्यासाठी वाहतूक नियमांविषयी जनजागृती व वाहनधारकांचे प्रबोधन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मृत्युंजयदूत संकल्पना, स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास सपोनि चंद्रकांत शेडगे, सपोनि कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, पोलीस कर्मचारी, महामार्ग मृत्युंजयदूत व नागरिक, वाहनधारक उपस्थित होते.

कोट

अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महामार्ग पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपअधीक्षक प्रीतम यावलकर व कोल्हापूर विभाग पाेलीस निरीक्षक प्रीती शिंत्रे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने मृत्युंजयदूत, नागरिक, वाहनधारक याचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेडगे, सहाय्यक निरीक्षक कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे आदी.

Web Title: Death angels should treat the injured immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.