कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:19 PM2017-09-06T14:19:20+5:302017-09-06T14:20:51+5:30
स्वाईन फ्ल्यु या संसर्गजन्य आजाराचा विळखा जिल्हयात दिवसेंदिवस घट्ट होत आहे. काल (मंगळवारी) कोल्हापूर जिल्हयातील वडणगे (ता. करवीर) आणि वाघवे (ता. पन्हाळा) येथील दोन महिलांचा स्वाईन फ्ल्युने येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मृत्यु झाला.
कोल्हापूर : स्वाईन फ्ल्यु या संसर्गजन्य आजाराचा विळखा जिल्हयात दिवसेंदिवस घट्ट होत आहे. काल (मंगळवारी) कोल्हापूर जिल्हयातील वडणगे (ता. करवीर) आणि वाघवे (ता. पन्हाळा) येथील दोन महिलांचा स्वाईन फ्ल्युने येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मृत्यु झाला.
सुवर्णा लक्ष्मण नरके (वय ५०, रा.वडणगे) व सरस्वती तुकाराम मगदूम ( ६८, रा. वाघवे) अशी मृत महिलांची नांवे आहेत. आतापर्यंत जिल्हयात स्वाईन फ्ल्युने ३४ जणांचा मृत्यु झाला आहे.
स्वाईन फ्ल्यु या आजाराने जिल्हयात डोकेवर काढले आहे. सीपीआर रुग्णालयात पाच व दोन खासगी रुग्णालयात ६ अशा एकूण ११ स्वाईन फ्ल्युचे संशयित रुग्ण आहेत. दोन आठवड्यापासून स्वाईन फ्ल्युच्या मृतांची संख्या वाढली आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.
सीपीआरमध्ये वडणगेतील सुवर्णा नरके यांना २८ आॅगस्ट २०१७ रोजी उपचारासाठी दाखल केले होते तर वाघवेतील सरस्वती मगदूम या वृद्ध महिलेला २९ आॅगस्ट २०१७ रोजी उपचारासाठी दाखल केले होते. या दोघींचा उपचार सुरु असताना मंगळवारी (दि. ५) मृत्यु झाला.मगदूम या गेली सतरा वर्ष अर्धांगवायूने ग्रस्त होत्या.काही वर्षापासून मगदूम कुटूंब कोल्हापूरातील साने गुरूजी वसाहतीत राहत होते.त्यांच्या पश्चात पती, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.