Kolhapur: जीवित असताना मृत असल्याचा दाखला, उचगावातील दिव्यांगाची पेन्शन झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:16 IST2025-01-14T16:46:01+5:302025-01-14T17:16:31+5:30

मोहन सातपुते उचगाव : जीवित दिव्यांग व्यक्तीला प्रशासनाने मयत दाखवून माणुसकीचा कळस गाठला आहे. संघटनेच्या माध्यमातून न्याय मागणाऱ्या दिव्यांग ...

Death certificate issued while alive, Pension of disabled person in Uchgaon stopped | Kolhapur: जीवित असताना मृत असल्याचा दाखला, उचगावातील दिव्यांगाची पेन्शन झाली बंद

Kolhapur: जीवित असताना मृत असल्याचा दाखला, उचगावातील दिव्यांगाची पेन्शन झाली बंद

मोहन सातपुते

उचगाव : जीवित दिव्यांग व्यक्तीला प्रशासनाने मयत दाखवून माणुसकीचा कळस गाठला आहे. संघटनेच्या माध्यमातून न्याय मागणाऱ्या दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम ऊर्फ मारुती सदाशिव चौगुले यांच्याच नावाची पेन्शन बंद झाल्याने त्यांनी शासनाच्या नावाने आक्रोश व्यक्त केला आहे.

एप्रिल २४ पासून संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारी पेन्शन मिळाली नाही. दोन्ही हातांनी दिव्यांग असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. बॅंक खात्यावर अजून का पेन्शन जमा झाली नाही याची चौकशी करण्यासाठी करवीर तहसील कार्यालय येथे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करणाऱ्या अधिकाऱ्याकडून उत्तम चौगुले यांना पेन्शन कधी मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने मी जिवंत असताना मृत असल्याचे सिद्ध केले. एप्रिल २३ पासून पेन्शन बंद आहे. मयत झाल्याचा दाखला कोणीतरी मुद्दाम सादर केला आहे. ज्यांनी दाखला दिला आहे त्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच माझ्या हक्कावर गदा न आणता शासनाने त्वरित अनुदान द्यावे. -उत्तम चौगुले, जिल्हाध्यक्ष, दिव्यांग सेना.

Web Title: Death certificate issued while alive, Pension of disabled person in Uchgaon stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.