मळणी मशीनमध्ये अडकलेल्या जखमी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:28+5:302021-03-18T04:23:28+5:30

कोल्हापूर : शेतात मळणी करताना मशीनमध्ये साडीचा पदर अडकून गळफास लागून अत्यावस्थ असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील महिलेचा बुधवारी ...

Death of an injured woman trapped in a threshing machine | मळणी मशीनमध्ये अडकलेल्या जखमी महिलेचा मृत्यू

मळणी मशीनमध्ये अडकलेल्या जखमी महिलेचा मृत्यू

Next

कोल्हापूर : शेतात मळणी करताना मशीनमध्ये साडीचा पदर अडकून गळफास लागून अत्यावस्थ असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील महिलेचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. इंदूबाई पांडुरंग माळी (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ९ मार्च रोजी शेतात मळणीचे काम सुरू असताना इंदूबाई माळी यांच्या साडीचा पदर मळणी मशीनच्या पंख्यात अडकला. त्यामुळे पंख्यात साडी गुरफटून माळी यांच्या गळ्याला साडीचा फास लागला. त्यावेळी शेजारी काम करणाऱ्यांनी तातडीने मशीन बंद करुन त्यांची सुटका केली. त्यांना ताडीने खासगी रुग़्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी रात्री पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सीपीआर पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Death of an injured woman trapped in a threshing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.