विजेचा शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:28+5:302021-08-17T04:29:28+5:30

कोल्हापूर : येथील रंकाळा स्टँड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारण्यासाठी बोअरचे बटण सुरू करत असताना विजेचा शॉक ...

Death of a minor girl due to electric shock | विजेचा शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

विजेचा शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Next

कोल्हापूर : येथील रंकाळा स्टँड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारण्यासाठी बोअरचे बटण सुरू करत असताना विजेचा शॉक बसून अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंकिता अनिल शेळके (वय १५, रा. राजेंद्रनगर, सध्या रा. रंकाळा स्टँड परिसर) असे तिचे आहे. ही दुर्घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुलीचे मामा महेश ब्रह्मदेव सोनवणे (वय ३५, रा. राजेंद्रनगर ) यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक संदीप संकपाळ (रा. नागाळा पार्क ) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संदीप संकपाळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे रंकाळा स्टँडनजीक इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामावर नूतन अनिल शेळके यांना वॉचमन व बांधकामावर पाणी मारण्यास ठेवले. बांधकामावरील बोअरच्या मीटरमध्ये वायरिंग खराब झाल्याने शॉक बसत असल्याची तक्रार शेळके यांनी संकपाळ यांच्याकडे केली होती, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी सकाळी अंकिता शेळके ही पाणी मारण्यासाठी बोअर सुरू करत होती. इलेक्ट्रिक बोर्डवरील बटण सुरू करताना विजेचा शॉक लागून ती जागीच कोसळली. तिला तातडीने उपचारासाठी रुग़्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, मृत्यूची बातमी कळताच तिच्या आईने हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश मन पिटाळून टाकणारा होता. तिच्या पश्चात आई, बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे.

संतप्त कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

घटनेनंतर नातेवाईक, कार्यकर्त्यांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली. संबंधित मालकावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. कारवाई न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी सीपीआर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर संबंधित मालकावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आंदोलनात आरपीआय कामगार आघाडीचे गुणवंत नागटिळे, शहर कार्याध्यक्ष राहुल कांबळे, मुस्ताक मलबारी, धनंजय महाडिक युवाशक्तीचे शहराध्यक्ष नामदेव नागटिळे, समाधान बनसोडे, प्रवीण बनसोडे, महेश सोनवणे, पंकज आठवले, पिंटू खेडकर, विकास नाईक, आप्पा कुचेकर, तानाजी मिसाळ, रोहन मोरे, रोहन मोरे, रवी वाघमारे, शिरसाट आठवले, साजन गुरखा आदींचा सहभाग होता.

फोटो नं. १६०८२०२१-कोल-अंकिता शेळके

फोटो नं. १६०८२०२१-कोल-रास्ता रोको आंदोलन

ओळ : रंकाळा स्टँड परिसरात बांधकामावर विजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू झाल्याने संबंधित मालकावर गुन्हा नोंदवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारी सीपीआर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

160821\16kol_3_16082021_5.jpg~160821\16kol_4_16082021_5.jpg

फोटो नं. १६०८२०२१-कोल-अंकिता शेळके फोटो नं. १६०८२०२१-कोल-रास्ता रोको आंदोलनओळ : रंकाळा स्टॅड परिसरात बांधकामावर वीजेचा शॉक लागनू मुलीचा मृत्यू झाल्याने संबधीत मालकावर गुन्हा नोंदवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारी सीपीआर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.~फोटो नं. १६०८२०२१-कोल-अंकिता शेळके फोटो नं. १६०८२०२१-कोल-रास्ता रोको आंदोलनओळ : रंकाळा स्टॅड परिसरात बांधकामावर वीजेचा शॉक लागनू मुलीचा मृत्यू झाल्याने संबधीत मालकावर गुन्हा नोंदवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारी सीपीआर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Death of a minor girl due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.