अपघातातील जखमी अल्पवयीन मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:51+5:302021-06-03T04:18:51+5:30
गंभीर जखमी झालेल्या त्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील संबंधित अल्पवयीन मुलावर दाखल झालेल्या ...
गंभीर जखमी झालेल्या त्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला.
त्यामुळे या घटनेतील संबंधित अल्पवयीन मुलावर दाखल झालेल्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. हा अपघात ७ एप्रिल रोजी झाला होता.
संबंधित अल्पवयीन मुलगा व मुलगी हे दोघे फिरायला हातकणंगले येथे गेले होते. तेथून परत येत असताना मोटारसायकल घसरून मुलगी रस्त्यावर आपटली, त्यात ती बेशुद्ध झाली. त्यामुळे संबंधित मुलाने तिला तेथेच जखमी अवस्थेत सोडून पलायन केले होते. परिसरातील नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळेपासून तिच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी तिची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने तिला कोल्हापूर येथे हलवण्यात येणार होते. त्यापूर्वीच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातास कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलावर सुरुवातीला वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी व आता अन्य चार कलमे वाढवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.