कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सांगलीतील कैद्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:40 PM2024-02-07T12:40:57+5:302024-02-07T12:41:30+5:30
कोल्हापूर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. ५) रात्री सीपीआरमध्ये मृत्यू झाला. ...
कोल्हापूर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. ५) रात्री सीपीआरमध्ये मृत्यू झाला. विलास खाशाबा साळुंखे (वय ७२, रा. कमळापूर, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृत कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर ३१ जानेवारीपासून सीपीआरमध्ये उपचार सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, २०१६ मध्ये झालेल्या खूनप्रकरणी साळुंखे याला अटक झाली होती. २०१७ मध्ये न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली. तब्येतीचा त्रास सुरू झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. कारागृह प्रशासनाने ३१ जानेवारीला त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.