मगरीच्या हल्ल्यात कवठेसारच्या वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:48 AM2020-12-17T04:48:25+5:302020-12-17T04:48:25+5:30
याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि. १३) कुसुम नांद्रेकर या मळीच्या शेतात गेल्या होत्या. पाणी पिण्यासाठी वारणा नदीतीरावर त्या ...
याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि. १३) कुसुम नांद्रेकर या मळीच्या शेतात गेल्या होत्या. पाणी पिण्यासाठी वारणा नदीतीरावर त्या गेल्या होत्या. त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी नदीपात्राच्या परिसरात शोध घेतला होता. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास शेतकरी अरुण नांद्रेकर यांना कुसुम यांचा मृतदेह मगरीच्या बिळाजवळच दिसून आला. याबाबतची वर्दी प्रकाश नांद्रेकर यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम कौंदाडे यांनी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी विलास निकम, अमोल अवघडे, सागर सूर्यवंशी, स्वप्निल नरुटे, हनुमंत मिसाळ, वनरक्षक गजानन सकट, हरीबा जाधव दाखल झाले होते.
चौकट - मगरीचा वावर
घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी वनविभागाला सूचना दिल्या होत्या. वनविभागाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आदित्य यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा सुरू असतानाच नदीपात्रात दहा ते बारा फूट लांबीच्या मगरीचा वावर पाहावयास मिळाला.
चौकट - नदीकाठी मगरींची दहशत
कवठेसार हद्दीतच नदीपात्रात जवळपास २५ मगरींचा वावर असल्याची चर्चा आहे. शेतीच्या कामामुळे अनेक शेतकरी नदी परिसराकडे जात असतात. या घटनेमुळे मगरींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
फोटो - १६१२२०२०-जेएवाय-०४-मृत कुसुम नांद्रेकर