गाडगीळ खून प्रकरणातील कैद्याचा मृत्यू-पाचगावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:04 AM2018-08-11T01:04:12+5:302018-08-11T01:07:31+5:30

येथील धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पैलवान अक्षय जयसिंग कोंडेकर (वय २३, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, पाचगाव) याचा शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. त्याच्या शरीरातील

Death of Prisoner in Panchgil murder case: Tension in Panchagat | गाडगीळ खून प्रकरणातील कैद्याचा मृत्यू-पाचगावात तणाव

गाडगीळ खून प्रकरणातील कैद्याचा मृत्यू-पाचगावात तणाव

googlenewsNext
ठळक मुद्देपांढऱ्या पेशी वाढल्याने मृत्यू : वैद्यकीय अधिकारी

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पैलवान अक्षय जयसिंग कोंडेकर (वय २३, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, पाचगाव) याचा शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. त्याच्या शरीरातील पांढºया पेशी वाढल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. परंतु, कोंडेकरच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या समर्थकांनी ‘सीपीआर’च्या आवारात गोंधळ घातला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
याबाबतची माहिती अशी की, गाडगीळ खून खटल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी अक्षय कोंडेकर (बंदी क्रमांक ७०८७) याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांत (गु. र. नं. ३१९ /२०१३) दाखल होता. त्याला २६ डिसेंबर २०१३ रोजी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तो बिंदू चौकातील उपकारागृहात होता. जन्मठेप प्रकरणी त्याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात २३ एप्रिल २०१८ रोजी आणण्यात आले होते. हा दिवंगत अशोक पाटील गटाचा कार्यकर्ता होता. कोंडेकर हा सर्कल ८, बरॅक क्रमांक एकमध्ये बंदी होता. मंगळवारी (दि. ७) त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने कारागृहातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यासाठी कारागृह प्रशासनाने मंगळवारी व बुधवारी (दि. ८) पोलीस पथकाची मागणी केली होती. परंतु, पोलीस प्रशासनाकडून कोल्हापुरातील आंदोलनामुळे हे पथक उपलब्ध झाले नाही. त्यानंतर गुरुवारी (दि. ९) पोलीस पथक उपलब्ध झाल्यानंतर दुपारी २.२५ मिनिटांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच पाचगावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.


सीपीआरमध्ये डॉक्टरसह नातेवाइकांना धक्काबुक्की
पैलवान अक्षय कोंडेकरच्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या मित्रांनी व समर्थकांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) अतिदक्षता विभागामधील डॉक्टरसह इतर रुग्णांच्या नातेवाइकांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी फिर्याद देण्याचा निर्णय संबंधित वैद्यकीय अधिकाºयाने घेतला.

Web Title: Death of Prisoner in Panchgil murder case: Tension in Panchagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.