निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:12+5:302021-01-19T04:26:12+5:30
कोल्हापूर : नारायण पार्क येथील लतादेवी श्रीपती पाटील (७१) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नात ...
कोल्हापूर : नारायण पार्क येथील लतादेवी श्रीपती पाटील (७१) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नात असा परिवार आहे.
-
जनाबाई देऊलकर
कोल्हापूर : ऐनीपैकी हुडा (ता. राधानगरी) येथील जनाबाई ज्ञानू देऊलकर (९२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
--
लक्ष्मीबाई भोसले
कोल्हापूर : लक्ष्मीबाई सोन्याबापू भोसले (८८) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
शानाबाई सोनुले
कोल्हापूर : विक्रमनगर येथील शानाबाई केरु सोनुले (९४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
---
राजेंद्र वारके
कोल्हापूर : कणेरीवाडी येथील राजेंद्र बाजीराव वारके (५६) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या बुधवारी आहे.
--
आक्काताई पोवार
कोल्हापूर : राजोपाध्ये नगर येथील आक्काताई बबनराव पोवार (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
--
संदीप गायकवाड
कोल्हापूर : कोडोली येथील संदीप बाळू गायकवाड (३४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. फुले वाहण्याचा विधी मंगळवारी कोडोली येथे आहे.
--
महादेव वाडकर
कोल्हापूर : कोरेनगर येथील महादेव शंकर वाडकर ( ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
दत्तात्रय पाटील
कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील दत्तात्रय पांडुरंग पाटील (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
--
अंबाबाई ठकार यांचे निधन
कोल्हापूर :मगदूम कॉलनी, पाचगाव येथील अंबाबाई आत्माराम ठकार (९६) यांचे निधन झाले. बिनखांबी गणेश मंदिर जवळील सिद्धेश्वर प्रिटिंग प्रेसचे पार्टनर आत्माराम ठकार यांच्या त्या पत्नी, जुन्या काळातील फुटबॉलपटू रामचंद्र ठकार यांच्या भावजय, तर प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. भरत ठकार यांच्या त्या काकू होत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
---