निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:35+5:302021-02-05T07:11:35+5:30
कोल्हापूर : देशासह परदेशामधील विविध सिंचन प्रकल्पांच्या उभारणीमध्ये अभियंता म्हणून योगदान देणाऱ्या बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील नारायण रामचंद्र ...
कोल्हापूर : देशासह परदेशामधील विविध सिंचन प्रकल्पांच्या उभारणीमध्ये अभियंता म्हणून योगदान देणाऱ्या बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील नारायण रामचंद्र नवांगुळ (वय ८३) यांचे गुरुवारी (दि. २१) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा अमोल, मुली धनश्री, माधवी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शांत व कुशल अधिकारी अशी नारायण नवांगुळ यांची ओळख होती.
बी. ई. सिव्हीलची पदवी मिळाल्यानंतर त्यांची पब्लिक सर्व्हिस कमिशनमधूून सिंचन विभागात थेट उपअभियंतापदी निवड झाली. त्यांनी दूधगंगा आणि वारणा नद्यांवरील धरण, इटिया, पेंच धरण, आदी प्रकल्पांमध्ये योगदान दिले. इथिओपिया इरिगेशन एक्सपर्ट म्हणूनही त्यांनी काम केले. सन १९९६मध्ये सुपरिंटेंडिंग इंजिनिअर पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी सिक्कीम, टेक्सास (युएसए), येमेन येथील सिंचन प्रकल्पांसाठी मार्गदर्शन केले. गेल्या आठ वर्षांपासून ते पुणे येथे राहात होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्यासमवेत ते ‘आनंदवन’मध्ये कार्यरत होते.
फोटो (२४०१२०२१-कोल-नारायण नवांगुळ (निधन)