निधन वार्ता भाग एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:59+5:302020-12-06T04:24:59+5:30
ऑल इंडिया चॅम्पियन नामदेव पाटील यांचे निधन कोल्हापूर : कुस्तीतील ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान नामदेव दत्तू पाटील (वय ७५, ...
ऑल इंडिया चॅम्पियन नामदेव पाटील यांचे निधन
कोल्हापूर : कुस्तीतील ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान नामदेव दत्तू पाटील (वय ७५, रा. महे, ता. करवीर) यांचे शनिवारी निधन झाले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे. १९७५ साली उत्तरेतील दिग्गज मल्ल कर्तार सिंह यांच्यासोबत झालेली दोनदिवसीय कुस्ती त्याकाळी चर्चेचा विषय ठरली होती. दिवंगत कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचे ते सहकारी म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनामुळे कुस्तीक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
फोटो : ०५१२२०२० कोल नामदेव पाटील (निधन)
हेमा राऊत
कोल्हापूर : संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ येथील हेमा नारायण राऊत (वय ४९) शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
फोटो : ०५१२२०२० कोल हेमा राऊत (निधन)
प्रताप जाधव
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ येथील प्रताप मधुकर जाधव (वय ६६) यांचे निधन झाले. भाविक विठोबा तालमीचे ते सचिव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
फोटो : ०५१२२०२० कोल प्रताप जाधव (निधन)
गुरुनाथ कुर्डेकर
कोल्हापूर : खरी कॉर्नर, शिंदे गल्ली येथील गुरुनाथ गणपती कुर्डेकर (वय ५४) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.
फोटो : ०५१२२०२० कोल गुरुनाथ कुर्डेकर (निधन)
बातमीदार : विनोद