करवीरमध्ये प्रथमच कोरोना मृतांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:38+5:302021-06-06T04:18:38+5:30

कोपार्डे - करवीर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत कोराेनाबाधित व कोरानामुळे मृत्यूची संख्या यामुळे हॉटस्पॉट झाला होता. पण आज कोरोनामुळे ...

The death toll in Corona dropped for the first time in Karveer | करवीरमध्ये प्रथमच कोरोना मृतांची संख्या घटली

करवीरमध्ये प्रथमच कोरोना मृतांची संख्या घटली

Next

कोपार्डे - करवीर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत कोराेनाबाधित व कोरानामुळे मृत्यूची संख्या यामुळे हॉटस्पॉट झाला होता. पण आज कोरोनामुळे मृत्यू झालेली संख्या एकवर आल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे. पण कोरोनाबाधितांचा आकडा जैसे थे असल्याने त्यावर आवर घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. करवीरमध्ये गेल्या दोन महिन्यांत कोरोना बाधितांचा आकडा जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक होता. दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३५० ते ४०० वर पोहचली होती तर मृतांचा आकडा ८ ते ९ येत होता. शहरालगतच्या गावाबरोबर ग्रामीण भागात अनेक गावात कोरोना रुग्णसंख्या व मृतांंची संख्या वाढू लागल्याने चिंंतेेचे वातावरण होते.

गेल्या दोन महिन्यांत तालुक्यात ९ हजार ३९९ कोरोनाबाधित रुग्णांंचा आकडा आला आहे. तर मृतांचा आकडा २७५ वर पोहचला आहे. आज करवीर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २६६ वर आला आहे तर मृताची संख्या एकवर आल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

चौकट

करवीर तालुक्यातील कोविड केंद्र फुल्ल - -

तालुक्यांत चार शासकीय व पाच खासगी कोविड केंद्राबरोबर अनेक रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण दररोज २५० ते ३५० च्या वर रुग्णसंख्या येत असल्याने बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत आहे.

Web Title: The death toll in Corona dropped for the first time in Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.