मृत्यूचा आकडा कमी येईना; रूग्णही वाढताहेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:07+5:302021-04-23T04:27:07+5:30
कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या आकड्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत नवे ...
कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या आकड्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत नवे ८२१ कोरोनाचे रुग्ण सापडले असून, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यांतील सहाजणांचा समावेश आहे. शासनाने आता जिल्हा आणि तालुकाबंदी केल्यामुळे याचे परिणाम दिसण्यासाठी आणखी १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोल्हापूर शहरामध्ये २९२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बुधवार (दि. २१) पेक्षा नगरपालिका क्षेत्रात कमी रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणी ७३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. करवीर तालुक्यात १३४ रुग्ण आढळले असून, इतर जिल्ह्यातील ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये १९०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १४७० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ५५१८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
चौकट
सर्वाधिक मृत इतर जिल्ह्यांतील
कोल्हापूर
बोंद्रेनगर येथील ६२ वर्षीय महिला, शास्त्रीनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगेशकरनगर येथील ५२ वर्षीय पुरुष
इचलकरंजी
बावने गल्ली येथील ७५ वर्षीय महिला आणि ३२ वर्षीय महिला
हातकणंगले
नवे पारगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, साजणी येथील ८० वर्षीय पुरुष, रुई येथील ६५ वर्षीय महिला, हुपरी येथील ५० वर्षीय महिला.
करवीर
चिंचवडे येथील ६६ वर्षीय पुरुष, वळिवडे येथील ७५ वर्षीय महिला, उचगाव येथील ७० वर्षीय पुरुष.
आजरा
किणे येथील ७५ वर्षीय पुरुष
शाहूवाडी
चरण येथील ६५ वर्षीय महिला, आक्कोली येथील ५५ वर्षीय महिला.
कागल
कागल येथील ५५ वर्षीय महिला.
राधानगरी
राशिवडे येथील ६५ वर्षीय पुरुष.
शिरोळ
जांभळी येथील ३० वर्षीय पुरुष, शिवाजी चौक टाकवडे येथील ८७ वर्षीय पुरुष.
चंदगड
शिंदी येथील ७२ वर्षीय पुरुष.
इतर जिल्हे
कुर्ला वेस्ट येथील ७२ वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील येथील ५१ वर्षीय पुरुष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील येडगाव येथील ७० वर्षीय पुरुष, फलटण येथील ७० वर्षीय पुरुष, पुरळ सिंधुदुर्ग येथील ७२ वर्षीय पुरुष, वाळवा तालुक्यातील वाशी येथील ७० वर्षीय महिला.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचा तो निर्णय योग्यच होता
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी एका आदेशानुसार अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा कोल्हापूर जिल्हाअंतर्गत प्रवास करणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केला होता; परंतु कोणी दबाव टाकला माहीत नाही; पण दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश मागे घेतला. परिणामी आता कोरोना रुग्णांची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या वाढतच निघाली आहे. अखेर प्रशासनालाच जिल्हाबंदीचा निर्णय घ्यावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांना हाच निर्णय आधी अमलात आणला गेला असता तर रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली असती, असे वैद्यकीय वर्तुळातून सांगण्यात येते.