बेशुद्धावस्थेतील औषध विक्री अधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:19+5:302021-04-08T04:26:19+5:30
गडहिंग्लज : शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अधिकाऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. विजय वामन जमदाडे (५० रा.वाई, जि.सातारा) ...
गडहिंग्लज : शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अधिकाऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. विजय वामन जमदाडे (५० रा.वाई, जि.सातारा) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (७) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना उघडकीस घडली; परंतु त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, जमदाडे हे एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत विभागीय विक्री अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोमवारपासून (दि.५) आपल्या दोन सहकाऱ्यांसह ते येथील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये मुक्कामाला होते.
मंगळवारी (दि.६) रात्री जेवण करून ते लॉजमध्ये झोपले होते. बुधवारी सकाळी उशिरापर्यंत ते उठले नव्हते. त्यांचे सहकारी उठवायला गेले, त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.