खुपिरेतील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:30+5:302020-12-07T04:19:30+5:30
कोल्हापूर : शेतात पिकावर तणनाशक औषध फवारणी करताना धुसकारा उडून विषबाधा झालेल्या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पृथ्वीराज सर्जेराव ...
कोल्हापूर : शेतात पिकावर तणनाशक औषध फवारणी करताना धुसकारा उडून विषबाधा झालेल्या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पृथ्वीराज सर्जेराव पाटील (वय २४, रा. खुपिरे, ता. करवीर) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना करवीर तालुक्यातील खुपिरे येथे घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पृथ्वीराज पाटील हा अविवाहित असून एमआयडीसी शिरोली येथे खासगी नोकरीस होता. तो शेतकरीही होता. दि. १७ नोव्हेंबर रोजी तो आपल्या खुपिरे येथील शेतात तणनाशक औषध फवारत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला मळमळल्यासारखे होऊन उलट्या झाल्या. त्यामुळे सीपीआर रुग्णालयात त्याला प्रथमोपचार घेऊन खासगी रुग्णालयात दाखल केले. गेले दोन दिवस त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर रविवारी त्याचा मृत्यू झाला. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. घटनेची करवीर पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
फोटो नं. ०६१२२०२०-कोल-पृथ्वीराज पाटील (मयत)
(तानाजी)